Take a fresh look at your lifestyle.

‘तुला.. कपड्यांची गरज आहे..; उर्फी जावेदचा बिकिनी व्हिडीओ पाहून नेटकरी वैतागले

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस ओटीटी’मूळे प्रकाश झोतात आलेली उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. शिवाय ती स्वतः सोशल मीडियावर एव्हढी सक्रिय असते कि स्वतःचे विविध फॅशन सेन्स दर्शविणारे फोटो आणि व्हिडीओ ती स्वतःच शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना तिचा कोणताही आणि कसाही लूक खूप आवडतो. पण बाकी नेटकरी मात्र ट्रोल करून करून दमतात. पण ट्रोलिंग होऊनही उर्फी तिचा फॅशनेबल अंदाज काही सोडत नाही. त्यामुळे तिची आणखीच चर्चा होते. आता पुन्हा एकदा ती बिकिनी व्हिडीओमुळे चर्चेतही आली आहे आणि ट्रोलदेखील होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

उर्फी जावेद हि ओटीटी बिग बॉसची स्पर्धक आहे. ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिने तिच्या बोल्ड अंदाजात बिकिनी ड्रेसमधील एक व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहेत. यावर चाहत्यांच्या एकापेक्षा एक भन्नाट कमेंट पहायला मिळत आहेत. काहींनी फायर इमोजी शेअर केले आहेत. तर काहींनी तिच्या सौंदर्याची वाहवाह केली आहे. तर काहींनी तिच्या फॅशन सेन्सच कौतुक केलं आहे. यात ट्रोलर्स काही मागे नाहीत बरं का.. ट्रोलर्सनेही तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

या व्हिडिओसोबत उर्फीने लिहिले आहे कि, ”I’m a rose that came from concrete!”. या व्हिडिओत उर्फी काळ्या रंगाच्या बिकिनीत दिसतेय आणि ती फुल वेचताना दिसतेय. दरम्यान ती एक फुल घेते आणि धडपडते मग सावरते आणि कानामागे लावते. या व्हीडिओला ९७ हजारहून अधिक लाईक आहेत. हा व्हिडीओ पाहून एकाने लिहिलं कि, ‘तुला फुलाची नाही, कपड्यांची गरज आहे.’ तर आणखी एकाने लिहिलं आहे कि, ‘ही मुलगी फेमस होण्यासाठी काहीही करू शकते. तर आणखी एकाने म्हटले कि, ‘भारतात वेड्या लोकांची कमी नाही आणि हि त्यातलीच एक आहे.’ तर आणखी एका युजरने लिहिले कि, ‘तू किती घाणेरडी दिसतेयस. तुला चांगले कपडे मिळत नाहीत का?. पण या ट्रोलिंगने उर्फीला काहीही फरक पडत नाही हे नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडिओमधून समोर आले आहे.