Take a fresh look at your lifestyle.

चांगली खेळलीस तू; व्हेलेंटाईनच्या आठवड्यात ‘ब्रेकअप रॅप साँग’चा फिव्हर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फेब्रुवारी हा महिना प्रेमीयुगुलांसाठी खास मानला जातो. कारण फेब्रुवारीच्या ७ तारखेपासून १४ तारखेपर्यंत व्हेलेंटाईन वीक साजरा केला जातो. या आठवड्यात ऐवज एक दिन वेगवेगळ्या वस्तू आणि पदार्थांची देवाण घेवाण करून प्रेम व्यक्त केले जाते. यात रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि अखेर व्हेलेंटाईन डे असे ७ दिवस साजरे केले जातात. हा पूर्ण आठवडा प्रेमाचा असतो. पण यंदा या व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रेमाचा नव्हे तर ब्रेकअपचा फिव्हर दिसून आलाय. होय. या आठवड्यात ब्रेकअप रॅप सॉंगने सोशल मीडिया गाजवलंय.

‘ब्रेकअप रॅप साँग’चा ऐन व्हॅलेंटाईन मध्ये आल्यामुळे व्हेलेंटाईन डे चा विचका होतो का काय असच वाटू लागलं आहे. कारण सध्या हे ब्रेकअपचं गाणं सोशल मिडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. “तिच्या सोबतीने केला आयुष्यातील सुंदर क्षणांचा प्रवास आणि तिच्याविना तळमळत राहिलो त्या क्षणांच्या आठवणीत. अशीच काहीशी अवस्था ब्रेकअप झालेल्यांची होते. ती नसली म्हणून आयुष्यच थांबलं का? तिच्याशिवाय आयुष्यात रस उरला नाही का? ‘किस्सा घर प्रॉडक्शन्स’, ‘मिडीया वर्क्स स्टुडियो’ यांच्या सहकार्याने हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलय. #BreakUpAnthemOfTheYear ‘चांगली खेळलीस तू’.

मयंक पुष्पम सिंह निर्मित आणि विनय प्रतापराव देशमुख दिग्दर्शित ‘चांगली खेळलीस तू’ हे एक भन्नाट मराठी ब्रेकअप रॅप गाणं आहे. या गाण्यात अभिनेता विनय प्रतापराव देशमुख स्वतः मुख्य भूमिकेत आहे. तर मराठी मालिका इंडस्ट्रीमधील ग्लॅमरस अभिनेत्री रुचिरा जाधव हि मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे.

या गाण्याच्या निमित्ताने रुचिरा, विनय देशमुखसोबत स्क्रिन शेअर करतेय. यांची नवी जोडी या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. रुचिराने आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. झी मराठीवरील ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेत रुचिराने साकारलेली ‘माया’ची भूमिका लोकप्रिय ठरली.