Take a fresh look at your lifestyle.

बीजेपी’चं तिकीट नक्की मिळणार; कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन करणारे विक्रम गोखले झाले ट्रोल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुण्यात त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात त्यांनी अनेक चालू असलेल्या राजकीय विषयांवर आपली परखड मते मांडली. यावेळी अनेक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. दरम्यान पत्रकारांशी बोलताना गोखलेंनी अनेक अश्या मुद्द्यांना हात घातला जे मुद्दे अतिशय तापलेले आहेत. अलीकडेच अभिनेत्री कंगना रनौतने देशाच्या स्वातंत्र्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. ज्यामुळे देशभरातून तिच्यावर टीका करण्यात आल्या. तरीही या वक्तव्याला गोखलेंनी मात्र पाठिंबा दिला आहे. इतकेच नव्हे तर यावेळी त्यांनी तोंड दुखेपर्यंत मोदींचं कौतुक केलं आहे. शिवाय शिवसेना – भाजप एकत्र आल्यास बरं होईल असंही त्यांनी म्हटलंय. मग काय? सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी असा काही ट्रोलिंगचा सूर धरला आहे कि बस्स..

मराठी अभिनेता विक्रम गोखले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले कि, लालबहादूर शास्त्री यांना सोडून देशातील इतर सर्व पंतप्रधानांना १०० पेक्षा कमी गुण देतो. तसेच लाल बहादूर शास्त्री यांची २ ऑक्टोबरला येणारी जयंती ही हेतू पुरस्पर पुसली जाते आणि त्याचा विसर पाडला जातो. हे किती वर्षाचं कारस्थान आहे. तसेच हा देश हिरवा होणार नाही, हा देश भगवाच राहीला पाहिजे, असं मत गोखलेंनी व्यक्त केलं. दरम्यान गोखलेंनी कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन करीत म्हटले कि, कंगना म्हणाली ते खरं आहे. मी तिच्या वक्तव्याचं समर्थन करतो. कुणाच्या मदतीने नाही तर देशाला स्वातंत्र्य हे भिकेनेच मिळालं आहे. स्वातंत्र्यवीर फाशीवर जात असताना त्यांना कुणीही रोखलं नाही’. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर सोशल मीडियावर उमटलेले प्रतिसाद यासाठीच्या तीव्र प्रतिक्रिया आहे.

   

 

सोशल मीडियावर विक्रम गोखलेंनी कंगनाला दिलेले समर्थन अनेकांनी अमान्य केले आहे. यातील काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे कि, हेच राहिलेलं.. आता तुमच्यासारखे ज्येष्ठ कलाकारसुद्धा असे प्रबोधन करणार असेल तर काय फायदा? तर एका नेटकऱ्याने गोखलेंनी मोदींचे केलेले कौतुक यावर निशाणा साधत म्हटले कि, यावेळी तुम्हाला बीजेपी’चं तिकीट नक्की मिळणार. तर अगदी टोकाचं ट्रोलिंग म्हणजे, एका नेटकाऱ्याने लिहिले कि, तुम्ही कोणता गांजा मारता. यावेळी माध्यमांशी बोलताना, मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं?, असा प्रश्नही विक्रम गोखले यांनी उपस्थित केला आहे.