Take a fresh look at your lifestyle.

तुम्ही बरे व्हाल, मला विश्वास आहे’; बिग बींसाठी लता मंगेशकर यांचं ट्विट

मुंबई | अभिनेता अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणे आढळली असून नानावटी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. बिग बींनी शनिवारी रात्री उशीरा ट्विट करत करोना झाल्याची माहिती दिली.

त्यानंतर कलाविश्वातील अनेकांना ते लवकरच बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. यात गानकोकिळा लता मंगेशकर यांनीही ट्विट करत त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. सोबतच ते लवकर बरे होतील, असा विश्वासही दाखविला आहे.

नमस्कार अमितजी. तुमच्यावर आणि अभिषेकवर देवाचा आशीर्वाद आहे. तुम्ही लवकरच बरे होऊन घरी यायल याची मला खात्री आहे”, असं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं आहे.