Take a fresh look at your lifestyle.

युवा फेम अभिनय बेर्डे साकारणार ‘दिशाभूल’ चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या “दिशाभूल” या आगामी नव्याकोऱ्या मराठी चित्रपटाच्या पहिल्या पोस्टर रिलीजपासूनच सर्वत्र चर्चा सुरु आहे. शिवाय या छत्रपटातील कलाकारांची नाव समोर आल्यानंतर तर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत आणखीच उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटात अभिनेता तेजस बर्वे, अभिनेत्री अमृता धोंगडे, अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार हे कलाकार मुख्य भूमिकेत असल्याचे आदीसह स्पष्ट झाले होते. यानंतर आता दिशाभूल या चित्रपटात अभिनेता अभिनय बेर्डे देखील मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे. अभिनय हा आताच्या युथचा लोकप्रिय अभिनेता आहे.

सान्वी प्रोडक्शन हाऊस निर्मित ‘दिशाभूल’ चित्रपटाची निर्मिती आरती चव्हाण यांनी केली आहे. तर दिग्दर्शन आशिष कैलास जैन करत आहेत. हा चित्रपट युथशी संबंधित असून एक वेगळे कथानक दर्शवणारा आहे. त्यामुळे ‘दिशाभूल’चे पहिले पोस्टर रिलीज झाल्यापासून हा मराठी चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. त्यात आता महाराष्ट्राचा लाडका युवा अभिनेता अभिनय बेर्डे ‘दिशाभूल’ या मल्टीस्टारर मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे युथ आणखीच आकर्षित होताना दिसते आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना युथफेम अभिनेता अभिनय बेर्डे म्हणाला कि, ‘दिशाभूल’ हा एक वेगळ्या धाटणीची कथा असलेलला चित्रपट आहे. यातील माझी व्यक्तीरेखा ही मी आज पर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी आहे. चित्रपटाचे शुटींग आम्ही सध्या गोव्यात करत आहोत. याशिवाय पुणे आणि कोकणातही शूटिंग आहे, ‘दिशाभूल’ टीम बरोबर काम करणे एन्जॉय करतोय. कॉलेज विश्वातील मुलांभोवती फिरणाऱ्या ‘ दिशाभूल’ मध्ये नेमकं काय आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे.

‘दिशाभूल’ या चित्रपटात अभिनय बेर्डे, अभिनेत्री अमृता धोंगडे, अभिनेता तेजस बर्वे, अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार प्रमुख भूमिकेत आहे.

तर अभिनेते नागेश भोसले, अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेता प्रणव रावराणे, शुभम मांढरे, रुही तारू, अरुण कदम, सिद्धेश्वर झाडबुके, आशुतोष वाडेकर, शरद जाधव, मंदार कुलकर्णी, गौतमी देवस्थळी हे देखील अन्य महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

 

अशी तगडी स्टारकास्ट घेऊन दिशाभूल लवकरच प्रदर्शित होऊ घातला आहे. ‘दिशाभूल’ चे डीओपी वीरधवल पाटील असून चित्रपटाला क्रिस मस्करेन्हस, प्रथमेश धोंगडे यांचे संगीत व गीते हरिभाऊ धोंगडे यांची आहेत. शिवाय नृत्य दिग्दर्शन नील राठोड, कला दिग्दर्शन वैभव शिरोळकर, वेशभूषा शीतल माहेश्वरी, मेकअप राजश्री गोखले, संकलन विनोद राजे, ध्वनी निलेश बुट्टे यांनी केले आहे.