Take a fresh look at your lifestyle.

अगंगं.. TRP घसरल्यामुळे ‘झी मराठी’कडून ‘या’ मालिकेला निरोपाचा नारळ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी मालिकेच्या टीआरपीची एक अल्लग कॉम्पिटिशन चालू आहे. कारण स्टार प्रवाह, झी मराठी, सोनी मराठी, कलर्स वाहिनी या मराठी वाहिनींवरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांना काही ना काही वेगळं मनोरंजन देत आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडे खूप पर्याय उपलब्ध आहेत. याचा परिणाम म्हणजे काही मालिका चालू असल्या तरीही त्यांचा प्रेक्षक वर्ग काही फार नसतो. ज्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक अशा मालिका आवरत्या घेतात.

आता झी मराठीवरील ‘सत्यवान सावित्री’ हि मालिकाच पहा ना. चालू होऊन या मालिकेला अगदी २ महिनेच झालेत त्यात हि मालिका संपवण्याच्या तयारीत निर्माते दिसत आहेत.

त्याच काय आहे, स्टार प्रवाह वाहिनीच्या तुलनेत झी मराठीचा टीआरपी आधीच घसरलाय. IMDb लिस्ट रेटिंग मध्ये टॉप १० च्या यादीत झी मराठीच्या फक्त ‘माझी तुझी रेशीमगाठ’ आणि ‘मन उडू उडू झालं’ याच मालिका टिकल्या.

त्यामुळे आता हि वाहिनी आपला टीआरपी वाढवण्यासाठी जवळपास चालू सगळ्याच मालिकांना निरोप देणार आहे. त्याजागी नवीन रिऍलिटी शो आणि नव्या मालिका या वाहिनीवर दाखल होत आहेत. म्हणूनच ‘मन झालं बाजींद’नंतर आता ‘सत्यवान सावित्री’ ही नवीन मालिका आणली होती. पण ती देखील फारशी चालत नाही हे समजल्यावर वाहिनीने या मालिकेलादेखील निरोपाचा नारळ द्यायचे ठरवले आहे. गेल्या १२ जून २०२२ रोजी सुरु झालेली हि मालिका येत्या काही दिवसांतच संपणार आहे अशी माहिती दिली जात आहे.

एकंदरच काय… प्रेक्षक माय बाप होता है सरकार! त्यामुळे झी मराठीला टीआरपीच्या घोडदौडीत मागे राहायचं नसेल तर भरभर पावलं उचलणं बंधन कारक आहे.

सध्या झी मराठीवर ‘मन उडू उडू झालं’, माझी तुझी रेशीमगाठ’, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’, ‘देवमाणूस २’, ‘तू तेव्हा तशी’ या मालिका आणि ‘होम मिनिस्टर खेळ सख्यांचा’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘बस बाई बस’, ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ हे रिऍलिटी शो सुरु आहेत.

यापैकी त्यातल्या त्यात मन उडू उडू झालं, माझी तुझी रेशीमगाठ, तू तेव्हा तशी या मालिका प्रेक्षकांच्या चांगल्या पसंतीस उतरल्याचे दिसत आहे.

आगामी काळात झी मराठीच्या प्रेक्षकांसाठी विविध नव्या मालिका सुरु होत आहेत. यामध्ये ‘नवा गडी, नवं राज्य’ या मालिकेतून अनिता दाते पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

याशिवाय ‘तू चाल पुढं’ या नव्या मालिकेतून अंकुश चौधरीची पत्नी आणि अभिनेत्री दीपा परब चौधरी पुन्हा एकदा मराठी मालिका विश्वात पदार्पण करत आहे.

इतकेच नाही तर ‘अप्पी आमची कलेक्टर’ या नव्या कोऱ्या मालिकेतून नवोदित अभिनेत्री शिवानी नाईकदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.