Take a fresh look at your lifestyle.

‘जोकच्या नावाखाली कायपण?’; सुरु होण्याआधीच ‘झी मराठी’चा नवा कॉमेडी शो झाला ट्रोल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्रात प्रत्येक घराघरांत पहिली जाणारी लोकप्रिय वाहिनी म्हणून झी मराठीचा उल्लेख केला जातो. यामुळे झी चा एकंदरच प्रेक्षक वर्ग फार….. फार…. फार्रर्रर्रर्रर्र मोठा आहे. त्यामुळे या वाहिनीवर कोणताही कार्यक्रम सुरु होणार म्हटल्यावर प्रेक्षकांमध्ये वेगळीच धाकधुक पहायला मिळते. पण यावेळी काहीसे उलटे झाले आहे. अलीकडेच झी मराठीवर सुरु होणाऱ्या नवा अफलातून कॉमेडी शो ‘हे तर काहीच नाय’चे प्रोमो प्रदर्शित होताना दिसत आहेत. मात्र यावेळी प्रेक्षक आनंदी आहेत का नाही? असा काहीसा सवाल उपस्थित राहतोय. याचे कारण म्हणजे अक्षरशः या प्रोमोवर शुभेच्छांचा नव्हे तर ट्रोलिंगचा पाऊस पडतोय.

येत्या १० डिसेंबर २०२१ पासून झी मराठी वाहिनीवर ‘हे तर काहीच नाय’ हा कॉमेडी शो सुरु होणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या प्रोमोमध्ये पुष्कर श्रोत्री तर दुसऱ्या प्रोमोमध्ये सोनाली कुलकर्णी भन्नाट मनोरंजक किस्से सांगताना दिसतेय. या प्रोमोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, अप्सरासुद्धा किस्से सांगण्यात पुढे हाय.नवा कार्यक्रम ‘हे तर काहीच नाय’ १० डिसेंबरपासून शुक्र ते शनि रात्री.०९:३० वाजता. तर या प्रोमोवर प्रेक्षकसुद्धा हे तर काहीच नाय अश्याच काहीश्या अविर्भावात कमेंट करताना दिसत आहेत.

‘हे तर काहीच नाय’ हा कार्यक्रम सुरू होण्याआधी ट्रोल होऊ लागला आहे हे दिसून येत आहे. दरम्यान प्रोमोवर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, एकदम भंगार विनोद तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, झी खरच पांचट झालंय. तर आणखी एकाने म्हटलं आहे की, हे असले जोक बगत बसण्या पेक्षा कार्टून मधील पेपा पिग बघितलेल बर ते जास्त मनोरंजन आहे.

तर आणखी एकाने झी मराठीवरचं थेट निशाणा साधत म्हटलं आहे की, झी चे लेखक दुसऱ्या चॅनल साठी काम करत आहे ..अस वाटत.. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, जोकच्या नावाखाली कायपण. अशा नकारात्मक कमेंट करून नेटकऱ्यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच कार्यक्रमाला नापसंती दर्शवली आहे. आता या कमेंट्स पाहिल्यानंतर खरंच शो सुरु होण्याआधी तोंडावर तर पडणार नाही ना अशी काहीशी भीती वाटू लागली आहे.