Take a fresh look at your lifestyle.

ट्विंकल खन्नाचं एक पाऊल कोरोना रुग्णांच्या साहाय्यासाठी; सर्व स्तरावर होतोय कौतुकाचा वर्षाव

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण भारतात कोरोना व्हायरसने अगदी उतमात माजवला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढतानाच दिसतोय. सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. याचा परिणाम थेट वैद्यकीय सुविधांवर होताना दिसतोय. कुठे रुग्णांना योग्य वेळेत ऑक्सिजन मिळत नाही तर कुठे बेड. इतकेच नव्हे तर इंजेक्शन आणि उपचार देखील मिळत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या विदारक परिस्थितीत आता कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी अभिनेत्री ट्विंकल खन्नाही पुढे आली आहे. ट्विंकल खन्नाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केले आहे. यात तिने अधिकृत आणि विश्वासार्ह एनजीओची माहिती मागितली आहे. जे रुग्णांच्या मदतीसाठी ऑक्सिजन सिलेंडर पुरवतात. मी त्यांना थेट लंडनवरुन ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करेन. असे ट्विट ट्विंकलने केलं आहे.

ट्विंकल खन्ना हि स्वतः एक अभिनेत्री असून बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारची पत्नी आहे. अक्षय कुमारच्या पावलावर पाऊल टाकत आता ती स्वतःही कोरोना बाधितांच्या मदतीचा सरसावली आहे. सध्या कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनासोबत वैद्यकीय सुविधांवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे सध्या अनेक सेलिब्रिटी त्यांच्या मदतीसाठी स्वतःहून पुढाकार घेत आहेत. यात ट्विंकल खन्नाचाही समावेश आहे. तिने नुकतेच एक नावेत केले आहे, ज्यात तिने म्हटले आहे कि, कृपया मला एका सत्यापित, विश्वसनीय, नोंदणीकृत एनजीओची लीड द्या जी १०० ऑक्सिजन सिलेंडर वितरीत करण्यात मदत करेल (ऑक्सिजनच्या 4 एल / मिनिटापर्यंत पुरवठा) त्यांना थेट यूकेमधून पाठविला जाईल.

कोरोना महामारीच्या काळात देशावर असलेल्या संकटाच्या काळात अक्षय आणि ट्विंकलच्या प्रयत्नांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. या संवेदनशील स्वभावाचं सोशल मीडियातून चाहते भरभरून कौतुक करीत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊन दरम्यान अक्षय कुमारने पीएम केअर फंडला २५ कोटींची मदत केली होती. काही दिवसांपूर्वी खिलाडी कुमारलाही कोरोनाची लागण झाली होती. पण त्यावर अवघ्या नऊ दिवसांत मात करत अक्षय घरी परतला होता. याची माहिती देखील सोशल मीडियावर ट्विंकल खन्नाने दिली होती.