Take a fresh look at your lifestyle.

आमिरच्या ‘३ आयडिट’ने जपानमध्येही सुरू ठेवली आपली जादू, बंद होणार्‍या थिएटरचा शेवटचा शोदेखील होता “हाऊसफुल”

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । राजकुमार हिरानी दिग्दर्शित आमिर खानचा ‘३ इडियट्स’ हा जगभरातील सदाबहार चित्रपटा पैकी एक असून तो जपानमध्ये प्रदर्शित होणे हा त्याचा पुरावा आहे. वास्तविक, ओसाका, जपानमधील एक थिएटर कायमचे बंद केले जात होते आणि त्यांनी त्यांचा शेवटचा चित्रपट म्हणून ‘३ इडियट्स’ दाखविण्याचा निर्णय घेतला. खास गोष्ट म्हणजे तो ‘३ आयडिट्स’ शो हा हाउसफ़ुल्ल झाला, जो हे सिद्ध करतो की तो एक सर्वात महत्वाचा आणि प्रभावशाली चित्रपट आहे आणि तो जगभरातील आवडत्या चित्रपटांपकी आहे.

थिएटर संयोजकांनी ‘३ इडियट्स’शी संबंधित २९ फेब्रुवारी रोजी ट्विटरवर ट्वीट केले होते की, “फ्यूज लाइन सिनेमाचा शेवटचा कार्यक्रम आज (शनिवारी) दुपारी ३.३० वाजता दाखविला जाईल. १३१ दर्शक. हाऊसफुल. धन्यवाद.” ” २००९ मध्ये बनलेला ‘३ इडियट्स’ हा चित्रपट २०१३ मध्ये पहिल्यांदा जपानमध्ये दाखविला होता. याशिवाय परदेशातील ५१५ स्क्रीनवर आणि देशभरातील १०००० स्क्रीनवर ३ इडियट्स रिलीज झाली.

आमिर खान आणि करीना कपूर खान तसेच शरमन जोशी, आर माधवन आणि बोमन इराणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘३ इडियट्स’ हा चित्रपट २५ डिसेंबर २००९ रोजी रिलीज झाला. रिलीजच्या वेळी या चित्रपटाचे खूप कौतुक झाले आणि भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठी ओपनिंग करण्यात ‘३ इडियट्स’ यशस्वी ठरला.