Take a fresh look at your lifestyle.

‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाचे शेड्यूल संपले, मोना सिंग फोटो केले शेअर

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । आमिर खान त्याच्या आगामी ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटात तीन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील अनेक शहरांमध्ये केले जात आहे. चंदीगडमध्ये चित्रपटाचे शेड्यूल नुकतेच संपले आहे. या चित्रपटात आमिर सोबत महत्वाची भूमिका साकारणाऱ्या मोना सिंगने शेड्यूल संपल्यावर त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

शूटिंगनंतर पार्टी करताना मोना सिंगने फोटो शेअर केले. मोनाने लिहिले – अजून मेहनत करा आणि आणखी पार्टी करा. चंदीगडचे शेड्यूल संपले.आता अमृतसरला जाणार आहे.

 


View this post on Instagram

Schedule wrap party is a must #laalsinghchaddha

A post shared by Tarannum Khan (@teasemakeup) on Mar 4, 2020 at 10:09pm PST

करीना कपूर खानदेखील लाल सिंग चड्ढामध्ये आमिर बरोबरच्या भूमिकेत दिसणार आहे. आमिरने करिनाचा लूक शेअर करताना लिहिले- मिळण्याची अस्वस्थता, गमावण्याची भीती… आयुष्याचा असा प्रवास. व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा करीना. या चित्रपटात मी तुझ्याबरोबर रोमांस करू शकू अशी माझी इच्छा आहे.

अद्वैत चंदन हे लालसिंग चड्ढा यांचे दिग्दर्शन करीत असून चित्रपटाचे लेखन अतुल कुलकर्णी यांनी केले आहे. आमिर खान प्रोडक्शन आणि व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. १९९४ मधील ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा हा अधिकृत रीमेक आहे. लालसिंग चड्डा ख्रिसमस २०२०मध्ये रिलीज होणार आहे. प्रत्येकजण या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे.