Take a fresh look at your lifestyle.

मिस्टर परफेक्ट आमिर खानची मुलगी मानसिक आजाराने त्रस्त; स्वतः पोस्ट करीत दिली माहिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मिस्टर परफेक्ट अशी ओळख असणारा अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान हि नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय दिसते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेतसुद्धा असते. पण यावेळी ती तिच्या मानसिक आजारामुळे चर्चेत आहे. होय अमीर खानची मुलगी मानसिक आजाराने त्रस्त आहे आणि याबाबत ती स्वतः सोशल मीडियावर मोकळेपणाने व्यक्त झाली आहे.

तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एंग्झायटी अॅटॅक्सबद्दलची पोस्ट लिहिली आहे. आपल्याला एंग्झायटी अॅटॅक्स येत असल्याचं तिने या पोस्टद्वारे सर्वांना सांगितलं आहे. याआधीही ती डिप्रेशनच्या त्रासातून जात होती. यासाठी कित्येक वर्षांपासून ती उपचारसुद्धा घेतेय.

या पोस्टमध्ये तिने लिहिलंय कि, “एंग्झायटी अॅटॅक्स येऊ लागले आहेत. मला आधीही एंग्झायटीचा त्रास होता आणि त्यामुळे माझं मन सतत भरून यायचं. सतत मला रडावसं वाटायचं. पण याआधी मला कधीच एंग्झायटी अॅटॅक आले नव्हते. पॅनिक आणि पॅनिक अॅटॅक्समध्ये फरक असतो. तसंच एंग्झायटीबद्दल जेवढी माहिती मला आहे, त्यानुसार एंग्झायटी अॅटॅक्सची शारीरिक लक्षणं दिसून येतात. उदाहरणार्थ धडधडणं, धाप लागणं, रडण्यासारखं वाटणं. या गोष्टी हळूहळू वाढत जातात आणि एकेदिवशी सगळंच संपेल असं वाटतं. सध्या मी अशाच गोष्टींचा सामना करतेय. पॅनिक अटॅक कसे असतात याबद्दल मला माहित नाही”.

आपल्या मानसिक आजारासाठी घेत असलेल्या उपचारांबद्दल बोलताना आयरा म्हणाली कि, “हा खरोखरंच खूप विचित्र अनुभव आहे. माझ्या थेरपिस्टने असं सांगितलंय की जर हे सतत (दोन महिन्यांतून एक-दोनदा येण्याऐवजी दररोज येऊ लागले तर) येऊ लागले तर मला माझ्या डॉक्टरांना किंवा मग मानसोपचार तज्ञांना सांगावं लागेल. जर एखाद्याला कसं वाटतंय..? हे वर्णन करायचं असेल तर याची थोडीशी मदत होऊ शकेल. यात तुम्हाला खूपच असहाय्य असल्यासारखं वाटतं.

कारण मला खरंच झोपायचं असतं आणि त्यामुळे मी नीट झोपूही शकत नाही (मला रात्रीच्या वेळी एंग्झायटी अॅटॅक्स येत आहेत). मी कोणत्या गोष्टींना घाबरतेय याचा विचार करतेय, आत्मपरिक्षण करतेय. पण एकदा का एंग्झायटी अॅटॅक येऊ लागला मी त्याला थांबवू शकत नाही. तुम्हाला ते सहन करून त्यातून बाहेर पडावं लागेल, हेच मला आतापर्यंत समजलंय.” यामध्ये आयराने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी बोलल्यामुळे आणि श्वसनाच्या काही व्यायामांमुळे थोडीफार मदत होत असल्याचं सांगितलं आहे.