Take a fresh look at your lifestyle.

Aashram 3 Trailer| बाबा निराला.. स्वरूपी की बहुरूपी..? गोष्ट एका बदनाम ‘आश्रम’ची

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ( Aashram 3 Trailer ) बॉलीवूड दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या एम एक्स प्लेअरवरील ‘आश्रम’ या वेबसीरिजचे दोन्ही भाग हिट झाल्यानंतर आता लवकरच तिसरा भाग येतोय. नुकताच याचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि आता सगळेच वाट पाहत आहेत कि आश्रमचा तिसरा भाग कधी एकदा रिलीज होतोय. कारण आश्रम वेब सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाने प्रेक्षकांची उत्सुकता अशी काही ताणली आहे कि पुढे काय होणार..? हे जाणून घ्यायला अजूनही प्रेक्षक तितकेच आतुर आहेत.

आतापर्यंत आश्रमच्या पहिल्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे नक्कीच येणार आगामी तिसरा भागसुद्धा हिट जाणार अशी आशा आहे. या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिका असलेल्या बाबा निरालाच्या भूमिकेत अभिनेता बॉबी देओल आहे आणि यासाठी त्याने प्रचंड ट्रोलिंगचा सामना केला आहे. ( Aashram 3 Trailer )

मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा आश्रमाच्या तिसऱ्या भागाचे चित्रिकरण सुरु होते त्यावेळी दिग्दर्शक प्रकाश झा यांना सेटवर मारहाण झाली होती. तसा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लोकांनी धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. भोंदुगिरी, फसवणूक, सर्वसामान्य लोकांच्या देवाप्रती असणाऱ्या भावनेशी खेळून त्यांची होणारी लुट अशा सामाजिक मुद्दयांवर या मालिकेतून भाष्य करण्यात आले आहे.

( Aashram 3 Trailer ) या वेब सीरिजमधील बॉबी देओल याची मुख्य भूमिका लोकांना खटकत होती तर बबिताची लढाऊ वृत्ती आवडत होती. त्यामुळे हि वेळ तारून आता पुढील भाग येण्यास सज्ज झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षक या सीरिजच्या आगामी भागाच्या प्रतीक्षेत होते. अखेर प्रतीक्षा संपली. कारण आता मेकर्सने आश्रमच्या तिसऱ्या भागाचा ट्रेलर आणि प्रदर्शनची तारीख जाहिर केली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अत्यंत लोकप्रिय वेब सिरीजमध्ये बाबा निरालाच्या बदनाम ‘आश्रम’चा समावेश आहे. सध्या सोशल मीडियावर आश्रमच्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर चांगलाच व्हायरल होतोय. ( Aashram 3 Trailer ) या ट्रेलरला अवघ्या काहीच तासांमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांना प्रश्न पडलाय कि, बाबा निरालाच्या दुष्कर्मांवरून आता पडदा उठणार का..? बाबा आणि त्याच्या आश्रमाचा भांडाफोड होणार का..? गेल्या दोन सीझनमधून उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तर आता मिळणार का..?

कधी होणार रिलीज..? (Aashram 3 Trailer) 

मुख्य म्हणजे या तिसऱ्या सीझनमध्ये ईशा गुप्ता एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतेय. त्यामुळे नेटकऱ्यांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. एकंदरच काय कि, आता पुन्हा एकदा चर्चा होणार.. बदनाम ‘आश्रम’ची. येत्या ३ जून २०२२ रोजी एम एक्स प्लेअरवर हि वेब सिरीज रिलीज होणार आहे. ( Aashram 3 Trailer )