Take a fresh look at your lifestyle.

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा साकारणार जाट गँगस्टर,या व्यक्तिरेखेसाठी बनविली बॉडी

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन । आयुष शर्मा सध्या त्याच्या आगामी ‘क्वाथा’ या चित्रपटाची जोरदार तयारी करत आहे. त्याने ‘लवयात्री’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काहीच कमल दाखवू शकला नव्हता. मात्र आता ‘क्वाथा’ च्या निमित्तने तो बर्‍याच दिवसांनी पुनरागमन करीत आहे. या चित्रपटात आयुष लष्करी अधिकार्‍याच्या भूमिकेत दिसणार आहे. आयुषच्या या आगामी सिनेमात तो खूप वेगळ्या लुक मध्ये दिसणार आहे.

‘क्वाथा’ नंतर आयुष ‘सुगबुगाहट’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो जाट गँगस्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी आयुषने आपल्या शरीरावर खूप मेहनत घेतली आहे. तो आपल्या या बदलेल्या लूकचे फोटोज् सोशल मीडियावर शेअर करत आहे.

मस्क्युलर आणि टोन्ड बॉडीचा फोटो शेअर करताना आयुषने लिहिले- हा खूप लांबचा प्रवास होता. १२ किलो लीन मसल्स तयार करण्यासाठी मला १ वर्ष लागले . माझे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १०० टक्के समर्पण दर्शविल्याबद्दल राजेंद्र ढोले यांचे आभार.

 

‘क्वाथा’ बद्दल बोलायचे झाल्यास कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण भूटानी करीत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

 

Comments are closed.

%d bloggers like this: