Take a fresh look at your lifestyle.

२६ वर्षांनंतर महानायक अमिताभ बच्चन मराठी पडद्यावर ! ‘एबी आणि सीडी’ चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

चित्रपट सृष्टी । बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जेष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी त्यांच्या भल्यामोठ्या करियर मध्ये बऱ्याचदा एकमेकासोबत काम केलं आहे. दोन्ही कलाकारांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. मात्र आजही त्यांच्या कामात उत्साह दिसून येतो. विविध चित्रपट, रिएलिटी शो, जाहिरात यांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यातच आता ही जोडी लवकरच ‘ए बी आणि सी डी’ या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात हे दोघंही एकमेकांच्या मित्राच्या भूमिकेत दिसतील. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटात झळकणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे.

याआधी २६ वर्षांपूर्वी अमिताभ यांनी दीपक सावंत यांनी निर्मिलेल्या आणि श्रीधर जोशी दिग्दर्शित ‘आक्का’ ( १९९४) या मराठी चित्रपटात जया बच्चन यांच्यासोबत काम केलं होतं. आता २६ वर्षांनी बिग बी मराठी चित्रपटाच्या पडद्यावर दिसणार आहेत. मिलिंद लेले दिग्दर्शित ‘ए बी आणि सी डी’ या चित्रपटात ते महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.

पोस्टर वरून हा चित्रपट साधारण वृद्धाश्रम आणि त्यांच्या कुटुंबांवर बेतलेला दिसून येतो.

abcdposter_0

Comments are closed.