Take a fresh look at your lifestyle.

कोरोना धास्ती : अभिनेते दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये…

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । कोरोनाच्या धास्तीमुळे जगातील सर्वच नागरिक घाबरून गेले आहेत. सगळीकडे भीती वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे स्वतःच्या काळजीसाठी आणि कोरोनापासून बचाव होण्यासाठी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना आयसोलेशन व क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. मंगळवारी रात्री त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.

माझी पत्नी सायरा बानो माझी पूर्ण काळजी घेत आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही असंही त्यांनी सांगितल. कोरोना व्हायरसमुळे मी पूर्णपणे आयसोलेशन व क्वारंटाईनमध्ये आहे. मला कुठल्याही प्रकारचे इंफेक्शन होऊ नये, याची काळजी सायरा घेतेय,’असे दिलीप कुमार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरू नये, म्हणून ज्यांची प्रकृती नाजूक आहे अशांना क्वारंटाईन वा आयसोलेशनमध्ये ठवेले जाते. म्हणजेच, हवेशीर बंद खोलीत वेगळे ठेवले जाते. दिलीप कुमार यांना कोरोनाची लागण झालेली नाही. पण खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आयसोलेशन व क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

97 वर्षांचे दिलीप कुमार दीर्घकाळापासून आजारी आहेत. यादरम्यान त्यांना अनेकदा रूग्णालयात भरती करण्यात आले. अगदी अलीकडे त्यांच्या कंबरेचे दुखणे बळावले होते. यानंतर त्यांना उपचारासाठी लीलावती रूग्णालयात नेण्यात आले होते. यानंतर त्यांच्या कमरेचे दुखणे बरेच कमी झाले आहे. सायरा बानो यांनी एका व्हॉईस मॅसेजद्वारे ही माहिती दिली होती.

Comments are closed.

%d bloggers like this: