Take a fresh look at your lifestyle.

या बॉलिवूड अभिनेत्याने दिल्ली हिंसाचारावर केले होते ट्विट – लिहिले -”सलमान, शाहरुख आणि आमिर काहीही बोलत नाहीत,तर मी कोण …”

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । ईशान्य दिल्ली मधील हिंसाचारात ४२ लोक मरण पावले आहेत आणि २५० लोक जखमी झाले आहेत. या घटनेवर अनेक ठिकाणाहून बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या. बॉलिवूड कॉरिडोरच्या ट्विटमध्येही कलाकारांनी जोरदार ट्विट केले आहे. आता बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता कमल आर खान यांच्या एका ट्विटमुळे पुन्हा चर्चेत आलाय. या ट्विटमध्ये त्याने दिल्ली हिंसाचारावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याबद्दल सलमान खानवर निशाणा साधला आहे. कमल आर खान यांचे हे ट्विट बररेच लक्ष वेधून घेत आहे आणि लोकही यावर प्रतिक्रिया देत आहेत.

 

कमल आर खान यांनी लिहिलेः “बरेच लोक विचारतात की मी दिल्ली हिंसाचाराबद्दल काही का बोलत नाही. जर सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यावर काही बोलत नाहीत, मग मी का बोलू? सलमान खान बीइंग ह्युमन देखील चालवतो, मग तो काही का बोलत नाही. प्रत्येकजण स्वार्थी असतो आणि स्वतःसाठी जगतो. ” कमल आर खान यांनी अशाप्रकारे ट्विट केले आहे.

दिल्ली पोलिसांनी उत्तर-पूर्व दिल्लीतील हिंसाचाराच्या संदर्भात १६७ एफआयआर नोंदवल्या आहेत आणि ८८५ लोकांना अटक किंवा ताब्यात घेतले आहे. शनिवारी एका वरिष्ठ अधिकार्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले होते की ऑर्डनन्स अ‍ॅक्टनुसार ३६ गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया वेबसाईटवर भडकाऊ पोस्ट लिहिण्यासाठी पोलिसांनी १३ गुन्हे दाखल केले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले होते की अवैध आणि आक्षेपार्ह सामग्रीचा प्रसार करण्यासाठी अनेक सोशल मीडिया अकाउंट्स बंद केली गेली आहेत. ऑनलाइन व्यासपीठ सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियावर जबाबदारीने वापरण्यासाठी सल्ला देण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले होते की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्याबाबत लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

 

Comments are closed.