Take a fresh look at your lifestyle.

मस्त मौलाना मिथुन दा रुग्णालयात दाखल; व्हायरल फोटोमूळे चाहते चिंतेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड इंडस्ट्रीचे ‘डिस्को डान्सर’ म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे नेहमीच मस्त मौलाना अंदाजात जगताना दिसतात. शरीर थकलेले असले तरीही मिथुन दा आयकॉनिक स्टाईल काही सोडत नाहीत. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. पण सध्या ते चर्चेत असण्याचे कारण काही भलतेच आहे. प्रकृती अस्थैर्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे आणि याची माहिती मिळताच चाहते चिंतेत पडले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोमध्ये मिथुन दा रुग्णालयात असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे हा फोटो खरा कि खोटा अशी चर्चा सुरु असताना दुसरीकडे मिथुन दा यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने वडिलांच्या प्रकृतीविषयी माहिती देत चर्चा थांबविल्या आहेत.

मिमोह चक्रवर्तीने सांगितले कि, सोशल मीडियावर व्हायरल होणार फोटो हा खोटा किंवा अफवा नाही. मात्र वाढीव बातम्यांमुळे चाहत्यांची चिंता वाढत आहे. दरम्यान वडील मिथुन चक्रवर्ती यांच्या व्हायरल फोटोविषयी सविस्तर बोलताना मिमोह चक्रवर्ती याने सांगितलं कि, ‘मिथुन चक्रवर्ती यांना किडनी स्टोनचा त्रास उद्भवल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. व्हायरल झालेला हा फोटो रुग्णालयातलाच आहे. ज्यामध्ये मिथुन चक्रवर्ती बेशुद्धावस्थेत बेडवर झोपलेले आहेत. पण आता मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती स्थिर आहे”, असंही मिमोह चक्रवर्ती यांने सांगितले आहे. याशिवाय आता बंगळुरुमधील रुग्णालयातून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे आणि ते फीट आहेत असेही मिमोहने सांगितले.

 

बॉलिवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते मस्त मौलाना हटके डान्सर मिथुन चक्रवर्ती हे नेहमीच त्यांच्या डान्स आणि जॉली अंदाजामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर नेहमीच मिथुन दा झळकताना दिसतात. त्यांच्या अंदाजामुळे ते आजही तितकेच लोकप्रिय आहेत. यामुळे जेव्हा मिथुन दा यांची प्रकृती अस्वस्थ आहे असे समजले तेव्हा चाहते चिंतेत पडल्याचे दिसून आले. मात्र आता मिमोह चक्रवर्ती यांच्याकडून हेल्थ अपडेट समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला असे म्हणायला हरकत नाही.