Take a fresh look at your lifestyle.

‘या’ बॉलीवूड अभिनेत्याने इंटीमेट सीन शूट करतानाचा अनुभव केला ‘शेयर’…

0

चंदेरी दुनिया । बॉलीवूड असो व हॉलिवूड अनेकदा चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे अभिनेत्याकडून अभिनय देखील अपेक्षित असतो. मग कथानकात एखादा बोल्ड अथवा इंटीमेट सीन असला तरी तो त्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला करावा लागतो. अनेक कलाकार याकडे सकारात्मक दृष्टीने बघत तयार सुद्धा होतात. अलीकडेच, साऊथ सुपरस्टार आणि बॉलिवूड अभिनेता दुलकर सलमाननं याने एका कार्यक्रमात इंटीमेट सीन्स शूट करतानाचा त्याचा अनुभव शेअर केला आहे.

दुलकर सलमान या अभिनेत्याने अलीकडेच नेहा धुपिया हिच्या चॅट शो ‘नो फिल्टर नेहा’ मध्ये हजेरी लावली होती. नेहासोबत गप्पा मारताना त्याने अनेक मजेशीर किस्से सांगितले. इतकंच नव्हे तर इंटीमेट सीन शूट करतानाच त्याचा अनुभव देखील त्याने या शोच्या मंचावर सांगितला. तो म्हणाला की सिनेमातील इंटीमेट सीन शूट करताना तो खूप जास्त नर्व्हस होतो. इतकंच काय तर त्याचे हात-पाय सुद्धा थरथरतात असं तो म्हणाला.

दुलकर म्हणाला, “मी नेहमी याचा विचार करतो की हा इंटीमेट सीन करताना माझी को-ऍक्टर काय विचार करत असेल?”‘

इंटीमेट सीन करताना त्याने हात पाय थरथरतात म्हणून तो त्याचे हात नेहमीच त्याच्या को-ऍक्टरच्या केसांमागे लपवतो. तसेच तो म्हणाला की, “रियल लाइफमध्ये प्रेम व्यक्त करणं खूप सोपं असतं. कारण समोरच्या व्यक्तीला आपण नीट ओळखत असतो. पण जेव्हा हिच गोष्ट कॅमेऱ्यासमोर करायची असते, त्यावेळी ते खूप कठीण होऊन जातं.”

Leave a Reply

%d bloggers like this: