हॅशटॅग अन्वी ट्रेंडिंगवर; अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या शाही विवाह सोहळ्याचा व्हिडीओ चर्चेत
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही जगतातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेने नुकतेच तिचा बॉयफ्रेंड विकी जैन याच्यासोबत लग्नाचे सात फेरे घेतले आहेत. त्यांच्या लग्नाची चर्चा अगदी विकी कौशल आणि कॅटरिना कैफ च्या लग्नाइतकीच जोरदार होती. यानंतर अखेर आता लोखंडे जैन झाली आणि यानंतर सोशल मीडियावर आणखी एक हॅशटॅग चांगलाच बोलबाला करताना दिसतोय. हॅशटॅग अन्वी’ चा सोशल मीडियावर चांगलाच रंग जमला आहे. कारण अंकिता आणि विकी यांच्या शाही लग्नाचे सोनेरी क्षण फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर झळकत आहेत. लग्नात त्यांच्या नातेवाईकांनी दोघांवरही गुलाब पुष्पांचा वर्षाव केला आहे. सात फेऱ्या घेतानाही विकी सतत अंकिताला सांभळताना दिसत होता. हे क्षण इतके सुंदर आहेत कि कुणालाही भूल पडेल.
अंकिताच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तिने आपल्या साता जन्माच्या साथीदाराचा अर्थात विकी जैनचा हात अतिशय प्रेमाने पकडला आहे. या व्हिडिओमध्ये विकी आणि अंकिता दोघेही एकमेकांत विलीन होऊन देवा ब्राह्मणांच्या आणि आप्तेष्टांच्या साक्षीने अग्नीसाक्षी सात फेरे घेताना दिसत आहेत. दरम्यान अंकिताने गोल्डन लेहेंगा घातलेला दिसतोय आणि ती इतकी सुंदर दिसतेय कि हाये… तिच्या चेहऱ्यावरून आपल्याच नजरा हटत नाहीत मग विकीच्या कश्या हटतील? तर या व्हिडिओमध्ये विकी स्वतः अंकिताचा लेहेंगा सतत सांभाळत तिला सावरताना दिसतोय.
View this post on Instagram
लग्नाच्या प्रत्येक विधी दरम्यान अंकिता आणि विकीच्या चेहऱ्यावरील प्रत्येक रेष त्यांच्या मनातील आनंद सांगतेय. प्रत्येक विधी करताना त्या दोघांमध्ये लग्नाबाबत आणि त्यानंतर जागायच्या आयुष्याबद्दलची उत्सुकता पाहायला मिळत आहे. सात फेऱ्यांदरम्यान, अचानक विक्की पॅव्हेलियनवर हात उचलतो आणि नाचू लागतो. हे दृश्य पाहून अगदी सगळेचजण उत्साहित होतात आणि नाचतात. त्यांच्या लग्नाचा मंडप इतका सुंदर आणि लक्षवेधी होता कि बस्स. और क्या चाहिये? अशी काहीशी फिलिंग हा मंडप पाहून येते. लाल-पांढऱ्या फुलांनी सभोवताली सजावट आणि सगळीकडे हर्षोल्लास. अखेर दोन जीव एक झाले आणि नव्या पर्वाला सुरुवात झाली. मिस्टर अँड मिसेस जैन यांना वैवाहिक आयुष्यसाठी भरभरून शुभेच्छा!