Take a fresh look at your lifestyle.

क्रिकेटपटू नव्हे तर या दिग्दर्शकाशी जुळणार अनुष्काचे सूत ??

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून बाहेर येत होत्या. अनुष्का एका उत्तर भारतीय क्रिकेटपटूला डेट करत असल्याचेही सांगितले जात होते. एकीकडे जिथे अनुष्का तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून दुसरीकडे तिच्या लग्नाची तयारीही जोरदार सुरु असल्याचे म्हटले जात होते. तसेच हा क्रिकेटपटू कोण आहे याबाबत बरेच तर्कवितर्क तिच्या चाहत्यांद्वारे लावले जात होते. पण आता या सर्व अफवा असल्याचे म्हणत अनुष्काने चर्चा फोल ठरविल्या आहेत.

आता अनुष्काचे नाव एका दिग्दर्शकाशी जोडण्यात येते आहे. या दिग्दर्शकाचे नाव प्रकाश कोवेलमुडी आहे. ‘आयबी टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार येत्या काही दिवसांमध्ये अनुष्का लोकप्रिय दिग्दर्शक प्रकाश कोवेलमुडीशी लग्न करणार आहे असे सांगितले जातंय. मात्र अनुष्काने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्या दोघांकडे आहेत.

प्रकाशविषयी बोलायचे झाल्यास प्रकाश हा तेलुगू चित्रपट दिग्दर्शक के राघवेंद्र राव यांचा मुलगा आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून देखील काम केले आहे. ‘जजमेंटल है क्या’ या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करत त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. प्रकाशने २०१७ मध्ये कनिका ढिल्लोंशी घटस्फोट घेतला आणि आता तो अनुष्का शेट्टीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.