Take a fresh look at your lifestyle.

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न; झोपेच्या गोळ्यांचा घेतला ओव्हरडोस !

आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी केली होती एक ऑडिओ क्लिप रेकॉर्ड

टीम, हॅलो बॉलीवूड । जयश्री राव या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. झोपेच्या अतिरिक्त गोळ्या घेत जयश्रीने जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने असं का केलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु या प्रकारानंतर संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये या एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे.

जयश्रीने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी एक ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केली होती. या क्लिपमध्ये ती तिच्या मित्र-परिवाराला अखेरचा निरोप देत असून तिच्या संघर्षाच्या काळात ज्यांनी तिला मदत केली. त्यांचे आभार मानले आहेत. सध्या तिची ही ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे.

Serial-Actress-Jayashree-Photos-6सूत्रांच्या माहितीनुसार, जयश्री बऱ्याच दिवसांपासून पती इश्वरमुळे चर्चेत होती. बऱ्याचशा मुलाखतींमध्ये ती पतीच्या अफेअरवर खुलेपणाने व्यक्त झाली होती. आपल्या पतीचं अभिनेत्री महालक्ष्मीसोबत अफेअर असल्याचं तिचं म्हणणं आहे. तसंच इश्वरने आपल्याकडून लाखो रुपये घेतले असून तो पैसे परत करण्यास नकार देत असल्याचंही तिचं म्हणणं होतं. मात्र हे सारे आरोप इश्वर यांनी फेटाळून लावले आहेत. त्यामुळे कदाचित याच कारणामुळे जयश्रीने आत्महत्या करण्याचं पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, जयश्रीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर तिने तिच्या काही मित्रांना फोन केला. त्यानंतर तिच्या मित्रांनी तिच्या घरी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र सध्या तिची प्रकृती नाजूक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

7-53