Take a fresh look at your lifestyle.

फुलपाखरू फेम हृता दुर्गुळेचं शुभमंगलsss संपन्न; पहा फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकप्रिय मालिका ‘फुलपाखरू’मधील अभिनेत्री हृता दुर्गुळेचा मोठा चाहता वर्ग आहे. लाखो तरुण तिच्या स्माईलवर फिदा आहेत. अनेकांचं तिच्यावर खूप प्रेम आहे पण आता या तरुण प्रेमी युवकांचा प्रेम भंग झालाय असे म्हणायला हरकत नाही. कारण हृता ज्याच्यावर प्रेम करते तिने त्याच्यासोबत लग्न गाठ बांधली आहे. होय. डिसेंबरमध्ये साखरपुडा आणि आता लग्न करून हृता दुर्गुळे मिसेस शहा झाली आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड प्रतीक शहा याच्यासोबत लग्न केलं आहे. यामुळे लाखो तरुणांच्या दिल्याचे हजार तुकडे झाले आहेत. मजेची बाब वगळता ऋताच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिने इंस्टाग्राम काही फोटो शेअर केले आहेत.

ऋता दुर्गुळे हिचं लग्न १८ मे २०२२ रोजी बुधवारी पार पडलं. जवळचे नातेवाईक, मित्र मंडळींच्या उपस्थितीत हृताने बॉयफ्रेंड प्रतिकसोबत लग्नगाठ बांधली. यानंतर सोशल मीडिया इंस्टाग्रामवर अधिकृत हँडलद्वारे तिने आपल्या लग्नाचे खास क्षण चाहत्यांसह शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हृता आणि प्रतीक अतिशय सुंदर नवविवाहित जोडपे असल्याचे दिसून येत आहे.

त्यांच्यातील प्रेम आणि बॉण्ड अगदी स्पष्ट दिसून येतोय. हृताच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण सोशल मीडियावर शेअर करताना हृताने लिहिले कि, आता आणि कायमचे … १८-०५-२०२२ हृताने आपल्या लग्नाबाबत अतिशय गोपनीयता राखली होती. यामुळे अगदी मोजकेच लोक या सोहळ्याला उपस्थित होते.

दरम्यान, हृताने तिच्या साखरपुड्याच्या काही दिवस आधीच प्रतीकसोबतचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. यानंतर हृता दुर्गुळे आणि प्रतिक शाह यांनी २४ डिसेंबर २०२१ रोजी साखरपुडा केला. याबाबत तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली होती.

प्रतीक शहा हा अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचे दिग्दर्शनदेखील केले आहे.तर हृता सध्या ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत चाहत्यांचे प्रेम मिळवीत आहे.