Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री काजल अग्रवाल सोडणार सिनेइंडस्ट्री..?; चाहत्यांना दिलेले वचन तोडण्याची शक्यता

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड इंडस्ट्रीसोबत टॉलीवूडमध्येही आपल्या दर्जेदार अभिनयाने रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल म्हणे सिने सृष्टी सोडणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल गेल्या वर्षीच गौतम किचलूला याच्या सोबत लग्नबंधनात अडकली आहे. याशिवाय काजलने तिच्या लग्नादरम्यान आपल्या चाहत्यांना वचन देत तिने हे स्पष्ट केले होते की, ती चित्रपट करणार आणि चाहत्यांचे मनोरंजन करतच राहणार. आता मात्र काजल आपल्या वचनावरून फिरताना दिसतेय. एका मुलाखतीदरम्यान आता चित्रपटात काम करणार नसल्याचे तिने सांगितले आहे. यामुळे चाहते अत्यंत नाराज झाले आहेत.

अभिनेत्री काजल अग्रवालने नुकत्याच प्रसार माध्यमांसोबत झालेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ती अभिनय कायमचा सोडून देऊ शकते. या मुलाखतीतील वृत्तानुसार, काजल अग्रवाल म्हणाली की, ‘जर तिचा पती तिला चित्रपट करण्यास मनाई करेल, तर ती त्वरित अभिनय करणे थांबवेल’.

यापुढे बोलताना ती असेही म्हणाली की, ‘ती नवीन चित्रपट साइन करत नाहीये, तर ती केवळ साईन केलेल्या तिच्या जुन्याच कॉंट्रॅक्‍टवर लक्ष देत आहे’. हि माहिती बाहेर आल्यानंतर मात्र तिचे चाहते अत्यंत नाराज झाले आहेत.

अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी यांच्यासोबत ‘आचार्य’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोरतल्ला शिवा यांनी केले आहे. शिवाय ती ‘इंडियन २′ आणि ‘हे सिनामिका’ या तामिळ भाषिक चित्रपटांमध्येदेखील दिसणार आहे. नवऱ्याने मनाई केली म्हणून यापूर्वी भाग्यश्री पटवर्धननेही फिल्म इंडस्ट्री सोडून दिली होती. त्यामुळे आता काजलच्या पतीने तिला अभिनय करण्यास रोखले तर सिनेसृष्टी आणखी एक हरहुन्नरी आणि दर्जेदार नायिकेला मुकणार आहे.