मंदिरा बेदी झाली ट्रोल; मित्रासोबतचा हॉट Pool Pic ठरला कारण
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री मंदिरा बेदीचा नवरा आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील नावाजलेला दिग्दर्शक राज कौशल याचं गतवर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं होतं. अशा दुःखद समयी मंदीरा मनातून कितीही खचली असली तरीही ती अतिशय खंबीरपणे या परिस्थितीला सामोरी गेली होती. मात्र सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय असणारी मंदिरा कुठेतरी हरवल्याचे दिसून आले. या काळात तिने सोशल मीडियापासून काहीसे अंतर ठेवले आणि पुढे हळूहळू पुन्हा जगण्याच्या प्रयत्न्यात दिसून आली. आपल्या हॉट आणि बोल्ड पिक्समुळे चर्चेत असणारी मंदिरा आता पुन्हा एकदा हॉट पिकमुळेच चर्चेत आहे पण यावेळी चर्चेपेक्षा जास्त टीका झाल्याचे दिसून येत आहे.
जवळ-जवळ वर्षभरानंतर मंदिराने बिकिनी परिधान करीत हटके फोटो शेअर केले आहेत. दरम्यान या फोटो कॅप्शननुसार, मंदिरा सध्या थायलंडमधील फुकेत आयलंड वर आहे आणि ती आपल्या खास मित्राचा बर्थ डे सेलिब्रेट करतेय. तिने आपल्या खास मित्रांसोबत अर्थात आदित्य मोटवानी सोबतचा पूल साईड सेल्फी शेअर करीत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हाच तो फोटो ज्यामुळे मंदिरा बेदी सोशल मीडियावर ट्रोल होते आहे. कारण या फोटोमध्ये तिने आपल्या मित्राला घट्ट मिठी मारल्याचे दिसत आहे. शिवाय मंदिरानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,”हॅप्पी बर्थडे आदि. हा फोटो खूप काही बोलून जातोय, तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस, आपण दोघे एकमेकांना किती वर्षांपासून ओळखत आहोत, आपल्यात किती छान बॉन्डिंग आहे आणि मी तुझ्यावर किती विश्वास ठेवते या सर्व गोष्टींविषयी. तुला खूप प्रेम,आनंद आणि यश मिळो पुढील आयुष्यात. लव्ह यू, वयाच्या १७ व्या वर्षापासून माझ्यासोबत असलेल्या माझ्या खास मित्रा”.
मंदिरा बेदीने हे फोटो शेअर करताच अगदी काहीच वेळात हे फोटो व्हायरल झाले आहेत. इतकेच नव्हे तर नेटकऱ्यांनी तिला या फोटोवरून चांगलेच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘मजा आहे तुमची’. तर दुसऱ्यानं लिहिलं आहे, ‘हा कोण आहे, नवरा तर राहिला नाही तुझा, निधन झालं त्याचं’. हे अशा पद्धतीचं ट्रोलिंग पाहून मंदिराने फोटोवरील कमेंट सेक्शनच बंद करून टाकलं. पण तिच्या या फोटोंमूळे तिच्या काही चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तर काही चाहत्यांनी तिला जगू द्या म्हणत तिची बाजू घेतली आहे.