Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री संभावना सेठच्या वडिलांचे निधन; पोस्ट शेअर करीत दिली माहिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात मृत्यूचे तांडव होताना दिसत आहे. दरम्यान अनेक सेलिब्रिटींवर देखील दुःखाचे डोंगर कोसळत आहेत. काल अभिनेत्री संभावना सेठच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे. याबाबत संभावना ने स्वतःच माहिती दिली आहे. आधी कोरोना व त्यानंतर कर्डियाक अटॅक ने तिच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी मिळत आहे. संभावना ने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भातील माहिती देत एक पोस्ट शेअर केली आहे.

संभावनाने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आज सायंकाळी ५.३७ ला मी माझ्या वडिलांना कोरोना आणि त्यानंतर कार्डियाक अटॅक मूळे गमावले आहे. कृपा करून त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करा. अशा आशयाची पोस्ट शेअर करीत संभावना ने आपले दुःख चाहत्यांसह शेअर केले आहे.

काही दिवसांपूर्वी संभावना सेठच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एका नामवंत रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना कार्डी याक अरेस्टचा अटॅक आला. त्यातच त्याने निधन झाले.

संभावना स्वतः या कोरोनाच्या काळात गरजू लोकांसाठी कार्यरत आहे. नुकताच तिने ऑक्सिजन आणि औषधांच्या होणाऱ्या काळया बाजारा विरुद्ध आवाज उठविला होता. इतकेच नव्हे तर संभावना बऱ्याचवेळा सामाजिक कार्य करताना दिसते. यात तिच्यासह तिचा पती अविनाश द्विवेदी देखील सहभागी असतो.