Take a fresh look at your lifestyle.

चित्रपटासाठी थोडं थांबा..

0

चंदेरी दुनिया । संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात अभिनेत्री अदिती राव हैदरी झळकली. या चित्रपटात तिनं अल्लाऊद्दीन खिलजीच्या पत्नीची भूमिका साकारली. भूमिका छोटी असूनही तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. त्यानंतर मात्र, ती जणू इंडस्ट्रीतून गायबच झाली. सध्या तिनं हलक्या-फुलक्या भूमिका नाकारायचा सपाटाच लावला आहे.

मोठं बॅनर आणि ए लिस्टर सहकलाकार असतील, तरच आपण चित्रपट करू, असं तिचं म्हणणं असल्याचं कळतंय. त्यामुळे चित्रपटात पाहायचं असेल, तर थोडं थांबा असा सल्ला तिनं चाहत्यांना दिला आहे.

या आधी अदितीने भूमी, वझीर, मर्डर ३ असे हिट सिनेमे दिले आहेत. तसेच साऊथ इंडस्ट्री मध्ये सुद्धा सिनेमे केली आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: