Take a fresh look at your lifestyle.

कौतुकास्पद! सलमान खान कडून मुंबई पोलिसांना १ लाख सॅनिटायझर बाटल्या भेट

मुंबई । अभिनेता सलमान खान हा त्याच्या अभिनयासोबत नेहमीच अनेकांना मदत केल्याबद्दल चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये बऱ्याचजणांना उभे करण्यासाठी सलमानने मदत केल्याचे म्हंटले जाते. काही अभिनेत्रींना त्याने ब्रेक दिल्याच्याही चर्चा असतात. यासोबत बिईंग ह्युमन या त्याच्या संस्थेद्वारे तो समाजातील गरजूनाही मदत करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या घरातून काही गरजूना आपल्या घरातून धान्य आणि जीवनावश्यक किट पाठवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. संचारबंदी सुरु झाल्यापासून तो वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे. आता त्याने कोरोना युद्धात अग्रभागी काम करणाऱ्या मुंबई पोलिसांना १ लाख सॅनिटायझरच्या बाटल्या दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दल ट्विटर वर त्याचे आभार मानले आहेत.

बॉलिवूड स्टार सलमान खान याने काही दिवसांपूर्वी चित्रपटक्षेत्रातील २५ हजार कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे व धान्याचे किट वाटले होते. याची दखल  माध्यमांनी घेतली होती. आता त्याने मुंबई पोलिसांना १ लाख सॅनिटायझर च्या बाटल्या दिल्या आहेत. समिना शेख यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून ही  माहिती देत त्याचे कौतुक केले होते. ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केले होते. मुख्यमंत्र्यांनी ही पोस्ट शेअर करत सलमान खानचे कौतुक केले आहे तसेच आभार मानले आहेत.

 

सलमान खान हा बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. चित्रपट सृष्टीत त्यांच्या कुटुंबाचे योगदान मोठे आहे. त्यांचे वडील सलीम खान, भाऊ अरबाज खान व सोहेल खान हेही चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्वे आहेत. त्याच्या दानशूर स्वभावामुळे सलमान खान अनेकांचा प्रिय आहे. बिईंग ह्युमन च्या द्वारे सर्वप्रकारच्या गरजूना तो गेली अनेक वर्षे मदत करतो आहे. तसेच हिंदी बिग बॉस या गाजलेल्या शोचा तो सूत्रसंचालक आहे.