हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर फिल्म इंडस्ट्रीत सुरु असलेल्या घराणेशाही, गुंडगिरी आणि फेव्हरिझमच्या चर्चा आता म्युझिक माफियांपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. सोनू निगमनंतर आता गायक अदनान सामी आणि अलिशा चिनॉय यांनीही या म्युझिक माफियांच्या विरोधात आपला आवाज उठविला आहे. अदनान यांनी एका पोस्टद्वारे म्युझिक इंडस्ट्रीत आवश्यक असलेल्या काही बदलांचे वर्णन केले.
अदनान सामी यांनी लिहिले आहे की भारतीय चित्रपट आणि म्युझिक इंडस्ट्रीत गांभीर्याने बदल होण्याची गरज आहे. विशेषत: म्युझिकच्या बाबतीत, नवीन सिंगर्स, सीनियर सिंगर्स, म्युझिक कंपोजर्स आणि म्युझिक प्रोडयूसर्स यांचे वाईट शोषण होत आहे. एकतर त्यांची हुकूमशाही सहन करा नाहीतर तुम्ही बाहेर.. ज्यांना सर्जनशीलता नसते त्यांच्याद्वारेच सर्जनशीलता नियंत्रित केली जात आहे.
मेड इन इंडिया या गाण्याची गायिका अलिशा चिनॉय यांनीही अदनानची पोस्ट म्युझिक माफियांच्या विरोधात आवाज उठवत शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की ही एक विषारी इंडस्ट्री आहे, जिथे फिल्म आणि म्युझिक माफिया आपल्याला भीती आणि सामर्थ्याने सर्वकाही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. येथे काम कोणत्याही नैतिकतेशिवाय केले जाते आणि योग्य ती वागणूक मिळत नाही.