Take a fresh look at your lifestyle.

“शुभ मंगल ज्यादा सावधान” मधील ‘गे’ भूमिकेनंतर आयुष्मान आता दिसणार स्त्रीरोग तज्ञाच्या भूमिकेत

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन । बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आता आणखी एक उत्तम पटकथा घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. गेल्या शुक्रवारी आयुष्मान खुरानाचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट रिलीज झाला आणि त्याचा हा देखील चित्रपट लोकांना प्रचंड आवडला. मिळालेल्या वृत्तानुसार आयुष्मानने नुकताच एक नवीन चित्रपट साइन केला आहे. रिपोर्ट्सनुसार आयुष्मान खुराना त्याच्या पुढच्या चित्रपटात स्त्रीरोग तज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट एक सामाजिक कॉमेडी असेल, सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटाचे नाव ‘महिला विभाग’ असेल.

या चित्रपटात आयुष्मान खुराना याच्यासमवेत मुख्य भूमिकेत अलाया फर्निचरवाला असणार आहे.अलाया नुकतीच सैफ अली खानबरोबर जवानी जानेमन या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील अलायाचा अभिनय चांगलाच आवडला होता.अनुभूती कश्यप ‘महिला विभाग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाची कथा स्त्रीरोग तज्ञाच्या आयुष्यावर आधारित असेल जी मुलीला आश्रय देते आणि मग तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. हा चित्रपट जंगली पिक्चर्स प्रोडक्शन या कंपनी बनवत आहे. आयुष्मानने याआधी ‘बरेली की बर्फी’ आणि ‘बधाई हो’यां सारखे चित्रपट जंगली पिक्चर्स प्रोडक्शनसह केले आहेत.


View this post on Instagram

 

Photo by @rahuljhangiani Styling by @tanghavri Make up by @akgunmanisali

A post shared by Alaya F (@alaya.f) on Feb 22, 2020 at 12:27am PST

 

आयुष्मान खुरानाचे सर्व चित्रपट सध्या हिट होत आहेत आणि त्याचे चित्रपट वेगवेगळ्या थीम्सवर आधारित असून सामाजिक प्रश्नावर भाष्य करतात. “शुभ मंगल ज्यादा सावधान” मध्ये आयुष्मान खुरानाबरोबर त्याच्या जोडीदाराच्या भूमिकेत जितेंद्र हा होता. या चित्रपटात ‘बधाई हो’या चित्रपटात आयुष्मानबरोबर काम करणारी नीना गुप्ता आणि गजराज राव देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.

 

Comments are closed.

%d bloggers like this: