Take a fresh look at your lifestyle.

अजय देवगनचा ‘नवा रेट्रो लूक’ झाला लीक !

0

अजय देवगण सध्या ‘मैदान’ या क्रीडापट असलेल्या चित्रपटाच्या शुटिंग मध्ये व्यस्त आहे. त्याच्या चित्रपटातल्या लुक चे फोटोज लीक झाले आहेत. यात तो रेट्रो लूक मध्ये दिसत आहे. ८० च्या दशकातील मिशी आणि (टर्कोईज) पॅटर्नचा कोट घातलेला दिसत आहे. या आधी तो साधारणतः अशा रेट्रो लूक मध्ये वन्स अपॉन या टाइम इन मुंबई या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट फुटबॉल खेळावर अवलंबून आहे यात अजय देवगण प्रसिद्ध कोच सईद अब्दुल रहीम यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री किर्थि सुरेश हिने सुद्धा काम केलेलं आहे. झी स्टुडिओज, बोनी कपूर, आकाश चावला यांनी निर्मितीचे काम सांभाळले असून अमित शर्मा हे दिग्दर्शन तर सैवीन कुद्रोस यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२० ला रिलीज होणारे.

Maidaan’ 2020
‘Maidaan’ 2020

Leave A Reply

Your email address will not be published.