Take a fresh look at your lifestyle.

Still Walking..म्हणत अजय देवगनने शेयर केला काजोल सोबतचा ‘हा’ राॅमेंटीक फोटो

मुंबई | अजय देवगन आणि काजोल ही जोडी नेहमीच रसिकांच्या पसंतीला उतरते. त्यांच्या चाहत्यांसाठी काजोल आणि अजय यांची जोडी नेहमीच चर्चेचा विषय असते. आता Still Walking असं म्हणत अजय देवगन याने काजोल सोबतचा एक राँमेंटीक अंदाज मधील फोटो सोशल मिडियावर शेयर केला आहे.

२०१९ हे वर्ष आता संपत आले आणि २१ वर्षा पूर्ण व्हायला आता काही अवधी राहिलाय मात्र तरीही अद्याप आम्ही चालत आहोत अशा आशयाचं कॅप्शन अजयने सदर फोटोला दिले आहे. १० जानेवारी रोजी येऊ घातलेल्या तानाजी चित्रपटात देखील काजोल आणि अजय एकत्र दिसणार आहेत. काजोलचा मराठमोळा लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच भुरळ पाडणारा ठरणार आहे.

अजय देवगन आणि काजोल यांच्या जोडीने 90’s मधील चित्रपट चांगलेच गाजवले. काजोल – अजय ची जोडी म्हटल की चित्रपट हिट झालाच म्हणुन समजा असे समिकरण बनले होते.

Comments are closed.

%d bloggers like this: