Take a fresh look at your lifestyle.

संजय मिश्राच्या‘कामयाब’चित्रपटाला अजय देवगनचा पाठिंबा आणि केला व्हिडिओ शेअर…

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय मिश्रा आजकाल त्याच्या आगामी ‘कामयाब’ चित्रपटाची तयारी करत आहे. संजय मिश्रा यांच्या ‘कामयाब’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे, याला प्रेक्षकांचे खूप प्रेमही मिळाले आहे. संजय मिश्राने या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात बॉलिवूड अभिनेता अजय देवगनही त्याच्यासोबत दिसला आहे. या व्हिडिओमध्ये अजय देवगण त्याला सांगताना दिसत आहे की मी माझ्या आयुष्यात फक्त १०० भूमिका केल्या आहेत आणि एकाच चित्रपटात ४९९ भूमिका साकारल्या आहेत. पण ५०० वी भूमिका आम्ही एकत्र करू.

या व्हिडिओमध्ये अभिनेता अजय देवगणने संजय मिश्राला विचारले की त्याने त्याच चित्रपटात इतकी पात्रे कशी साकारली आहेत आणि त्याने उत्तर दिले, “दिल से किया है बस…आपका नाम लेता था और कूद जाता था.”यानंतर संजय मिश्रा यांनी आपल्या चित्रपटाचा प्रसिद्ध संवादही बोलला. ते म्हणाले, “एंजॉइंग लाइफ, और ऑप्शन ही क्या है…” हा व्हिडिओ शेअर करताना संजय मिश्रा यांनी लिहिले, “याला म्हणतात एक मोठा परिवार. शाहरुख खानने सादर केलेला आणि अजय देवगन यांचं समर्थन लाभलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला,प्रेक्षकांनी खूप प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद.या चित्रपटाची अद्याप तुम्हा सर्वांना खूपच प्रतिक्षा आहे हे आम्ही जाणतो आहोत.”

संजय मिश्रा यांच्या ‘कामयाब’ चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊस रेड चिलीच्या बॅनरखाली झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती गौरी खानने केली आहे. संजय मिश्रा आणि दीपक डोबरियाल स्टारर हा चित्रपट ६ मार्च रोजी रिलीज होत आहे. चित्रपटात संजय मिश्रा ४९९ पात्रांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.