Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता अजय देवगन झळकणार या तामिळ ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन । अभिनेता अजय देवगनने आपल्या १०१ व्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अजय देवगणन आज ट्विट करुन याची पुष्टी केली आहे की तो तमिळ फिल्म ‘कैथी’ च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. ‘तानाजी – द अनसंग वॉरियर’ चा स्टार अजय देवगणने आज ट्विटद्वारे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अजय देवगन यांनी ट्वीट करून लिहिले आहे- हो मी एका तामिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करत आहे, हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदर्शित होईल.

२५ ऑक्टोबर २०१९ रोजी रिलीज झालेला कार्थीचा चित्रपट कॅथी एका माजी अपराधीच्या आसपास फिरते, जो आपल्या मुलीला पहिल्यांदाच भेटणार आहे. त्याच्यासोबत एक जखमी पोलिस अधिकारी आह आणि आपल्या इच्छित स्थळी पोचण्याआधीच त्याचा एका ड्रग टोळीशी सामना होतो. लोकेश कानगराज दिग्दर्शित या तमिळ चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही चांगली कामे केली होती

 

 

यापूर्वी अजय देवगन तान्हाजी: द अनसंग वॉरियरमध्ये दिसला होता, ज्यात त्यांची पत्नी काजोल आणि अभिनेता सैफ अली खान यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २७५ कोटींची कमाई केली आहे.

 

Comments are closed.

%d bloggers like this: