Take a fresh look at your lifestyle.

अजय देवगन तिसऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ‘मैदाना’त सज्ज !

नया माल । मागच्या जुन्या पिढीच्या सुपरस्टार्स मधला अजय देवगण आणि अक्षय कुमार सध्या जोरदार कामगिरी करता आहेत. तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ च्या देदीप्यमान यशावर अजय देवगण सध्या स्वार आहे. आता आणखी एका नवीन प्रोजेक्ट सोबत तो चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. त्याच्या पुढच्या ‘मैदान’ या चित्रपटाच्या नवीन पोस्टर्सचे अनावरण आज करण्यात आले. साध्या अवतारात अभिनेता प्रभावी दिसत आहे. जेष्ठ फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या भूमिकेत तो दिसणार आहे. ‘मैदान’ मधून तो ‘भारतीय फुटबॉलची सुवर्ण वर्ष’ दाखवेल. अजयच्या चाहत्यांनी ट्विटरवर त्याच्या प्रभावी लूक बद्दल कौतुकाचा वर्षाव केला.

अजय देवगण ने बऱ्याच वेळा रिअल लाईफ कॅरॅक्टर प्ले केले आहेत. त्या सर्व चित्रपटांना चांगले यश आणि अवॉर्ड्स मिळाले आहेत. ‘जख्म’ आणि ‘द लीजेंड ऑफ भगतसिंग’, तान्हाजी, कंपनी, गंगाजल यानंतर आता मैदान. मैदान हा अजय साठी तिसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याचा मार्ग असू शकतो.

 

6-times-when-ajay-devgn-played-real-life-characters-920x518