Take a fresh look at your lifestyle.

कमाईच्या बाबतीत खरोखरच ‘खिलाडी’आहे अक्षय कुमार; 14 दिवसांच्या शूटिंगसाठी घेतोय 27 कोटी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन |बॉलिवूडचा अ‍ॅक्शन किंग अक्षय कुमार कमाईच्या बाबतीतही किंग आहे. अक्षय हा यावर्षीचा सर्वात जास्त चित्रपट करणारा अभिनेता आहे, या सर्व चित्रपटातून तो ‘छप्पर फाड के’ कमावतोय .उर्वरित बॉलिवूड स्टार्ससारख्या सिनेमांमध्ये नफा वाटण्याचे गणितावर अक्षय विश्वास ठेवत नाहीत, त्या बदल्यात तो दिग्दर्शकाकडून भरमसाठ फी घेतो. तो इंडस्ट्रीमधील सर्वात महाग आणि कमाई करणारा स्टार आहे. अक्षय कुमारच्या कमाईवर कोरोना विषाणूमुळे झालेल्या ब्रेकडाऊनचा परिणाम झाला असला तरी अक्षय आता आपल्या आगामी चित्रपटांद्वारे या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसते आहे.

वृत्तानुसार, आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या शूटिंगच्या दोन आठवड्यांच्या शूटसाठी अक्षय कुमारला फी म्हणून 27 कोटी मिळणार आहेत. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे, अक्षय 14 दिवसांच्या शूटसाठी 27 कोटी रुपये फी घेत आहे.

अतरंगी रे मध्ये सारा अली खान आणि साऊथ स्टार धनुष मुख्य भूमिकेत दिसतील. तर अक्षय कुमार या चित्रपटात खास दिसणार आहेत. अक्षय या चित्रपटात एका छोट्या भूमिकेत दिसणार आहे, मात्र त्याची भूमिका या चित्रपटात खूप महत्वाची ठरणार आहे. तो पहिल्यांदा सारा अली खान आणि धनुषबरोबर स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.

Comments are closed.