Take a fresh look at your lifestyle.

अक्षय कुमार, सारा अली खान, धनुषच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटाची शूटिंग वाराणसीत झाली सुरू

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खानच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटाची शूटिंग सुरू झाली आहे. काल सारा अली खान आणि धनुष वाराणसीला पोहोचले. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. ‘रांझणा’च्या नंतरची ही दुसरी वेळ आहे जेव्हा धनुष आणि आनंद एल राय एकत्र काम करत आहे.
आज या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे, ज्यांची माहिती कलर यलो प्रॉडक्शनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.

या चित्रपटात सारा अली खान बिहारी मुलीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात ती कदाचित दुहेरी भूमिकेत दिसू शकेल. सारा अली खाननेही अलीकडेच बनारसच्या घाट आणि गंगा आरतीची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.


View this post on Instagram

 

Ganga Nadi 🙏🏻💙

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on Mar 2, 2020 at 7:21am PST

अक्षय कुमारही लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सामील होणार आहे. पुढच्या वर्षी व्हॅलेंटाईन रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.