Take a fresh look at your lifestyle.

आलिया आणि अजय साऊथ इंडस्ट्रीमध्ये करणार धमाल,त्यांच्या “आरआरआर” या डेब्यू चित्रपटाचे पूर्ण नाव आले समोर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । आलिया भट्ट आणि अजय देवगन आजकाल बॉलिवूडमध्ये धमाल करत आहेत. दोघांच्याही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धडाका लावला आहे. बॉलिवूडनंतर आलिया आणि अजय साऊथ इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहेत. दोघे एसएस राजामौलीच्या आरआरआर चित्रपटात काम करत आहेत. हा चित्रपटाची यापूर्वीही चर्चा झाली आहे. आता “आरआरआर” चित्रपटाचेसंपूर्ण नाव समोर आले आहे.

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, “आरआरआर” चित्रपटाचे पूर्ण नाव ‘रघुपती राघव राजाराम’आहे. अहवालानुसार या नावाचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता परंतु अद्यापही याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगन आरआरआरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून पहिले वेळापत्रक संपले आहे. स्वातंत्र्य सेनानी अलुरी सीताराम राजू आणि कोमारम भीमा यांच्या कथा दाखवणारा हा पीरियड ड्रामा चित्रपट असेल.


View this post on Instagram

 

The stars are shining bright on the sets of #RRR! @ajaydevgn ji, @jrntr, @alwaysramcharan & @ssrajamouli from the shoot!

A post shared by RRR Movie (@rrrmovie) on Jan 29, 2020 at 5:32am PST

 

आरआरआरमध्ये बॉलिवूडबरोबरच काही हॉलिवूड स्टार्ससुद्धा दिसणार आहेत. या मोठ्या बजेट चित्रपटामध्ये सुमारे ३५०-४०० कोटी रुपये खर्च केले जातील. यापूर्वी हा चित्रपट ३० जुलै २०२० रोजी रिलीज होणार होता पण रणबीर सिंगच्या चित्रपटाच्या शमशेराच्या क्लैशमुळे रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता “आरआरआर” ८ जानेवारी २०२१ रोजी रिलीज होईल.