Take a fresh look at your lifestyle.

दिग्दर्शक साकेत चौधरी यांच्या चित्रपटात झळकणार आलिया भट्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । अभिनेत्री आलिया भट्ट ‘हिंदी मीडियम’ चे दिग्दर्शक साकेत चौधरी यांच्या आगामी सामाजिक चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसनार आहे. मुंबई मिररच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट एक महत्त्वाचा सामाजिक संदेश देईल.

एका स्त्रोताने सांगितले की, “साकेत बराच काळ या स्क्रिप्टवर काम करत आहे. स्क्रिप्ट आवडलेल्या आणि सहमत असलेल्या आलियाला कास्ट करण्यास ते उत्सुक होते.” लवकरच आलिया हा चित्रपट साइन करण्याची औपचारिक पूर्ण करणार आहे.

दरम्यान, या चित्रपटासाठी मुख्य नायकाचा शोध सुरू आहे. संपूर्ण कास्ट अंतिम झाल्यानंतर टीम शूटिंगच्या वेळापत्रक अंतिम करेल, असे सूत्रांनी सांगितले. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहेत.

या सोशल ड्रामाशिवाय आलिया आगामी ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये रणबीर कपूरच्या सोबत दिसणार आहे.