Take a fresh look at your lifestyle.

गांजा कम करो; मुघलप्रेमी नसिरुद्दीन शहांच्या वक्तव्याचा अमेय खोपकरांकडून खोचक समाचार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आणि मराठमोळे निर्माते अमेय खोपकर हे त्यांच्या परखड व्यक्तिमत्वामुळे ओळखले जातात. मनोरंजन सृष्टीशी संबंधित कोणत्याही वादग्रस्त विषयांवर खोपकर आपले मत नेहमीच मांडत असतात. अनेकदा चित्रपट सृष्टीतील कर्मचाऱ्यांसाठी खोपकरांनी केलेली आगपाखड सर्वानाच ठाऊक आहे. यानंतर आता बॉलिवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी एका मुघलांबाबत केलेले आश्चर्यकारक वक्तव्य पाहून खोपकरांनी शहांचे नाव न घेता बरोबर अचूक निशाणा साधला आहे.

सोशल मीडिया ट्विटरवर अमेय खोपकर यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले कि, कुछ ज़ख़्मोंका ईलाज़ नहीं किया तो वे नासीर बन जाते हैं। गांजा कम करो. Google की जगह आपने मुग़ल देख लिया। #NCB #old_age_publicity (काही जखमांवर वेळीच उपचार केला नाही तर तो नासीर होतो. गांजा कमी करा. गुगलच्या जागी तुम्ही मुघल पाहिलात. हॅशटॅगNCB हॅशटॅग वृद्धत्व प्रसिद्धी). या संपूर्ण ट्विटमध्ये पाहिलात तर नसिरुद्दीन यांचे नाव नाही. मात्र त्यांच्या नावाचा शब्दोच्चार नक्कीच आहे. शिवाय मुद्दा पाहिला तर कुणीही सांगेल कि हे ट्विट कुणाच्या वक्तव्यावरील प्रहार आहे.

त्याचे झाले असे की, ‘द वायर’ या न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांनी मुघलांविषयी उद्घोष करणारे आणि कौतुकास्पद विधाने केली आहेत. यावरून सोशल मीडियावरही संताप व्यक्त केला जात आहे. या मुलाखतीत नसिरुद्दीन म्हणाले कि, ‘मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण, मुस्लिम याचा सामना करतील. कारण आम्हाला आमचं घर वाचवायचंय, आम्हाला आमची मातृभूमी वाचवायची आहे, आपलं कुटुंब वाचवायचं आहे आणि आपल्या मुलांना वाचवायचं आहे.’ यानंतर पुढे म्हणाले कि, ‘मुघलांनी केलेल्या अत्याचारांबाबत वारंवार बोलले जाते. मात्र, आपण हे का विसरतो? या मुघलांनीच देशासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं आहे. मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते तर राष्ट्रनिर्माते होते. कारण याच लोकांनी देशामध्ये कित्येक स्मारकं उभारली. यांच्या संस्कृतीमध्ये नाच, गाणी, चित्रकारी, साहित्य अशा गोष्टींचा समावेश आहे. मुघल इथे या देशाला आपला देश बनवण्यासाठी आले होते. त्यांना खरं तर आपण शरणार्थी म्हणू शकतो.’