Take a fresh look at your lifestyle.

करण जोहरने मला कमीपणा दाखवला ; आमिर खानच्या भावाचा करण जोहर वर आरोप

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना राणावतने बॉलीवूड मधील घराणेशाही आणि गटबाजी अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यात कंगणाने चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आणि महेश भट्ट यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला होता. त्यानंतर आता अभिनेता आणि आमिर खानचा भाऊ फैसल खान याने करण जोहवर काही धक्कादायक आरोप केले आहे. करण जोहरने वारंवार माझा अपमान केला असून मला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं त्याने सांगितले.

करण जोहरने मला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला. तो माझ्यासोबत विचित्र पद्धतीने वागत होता आणि वारंवार मला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा मी कोणाशी बोलण्याचा प्रयत्न करायचो करण सतत माझा अपमान करत होता. त्यामुळे या घटनेनंतर अनेक गोष्टी घडल्या, ज्या संघर्षातून मला जावं लागलं”, असं फैसलने सांगितलं.

पुढे तो म्हणतो, “कलाविश्वातील अनेकांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये येण्यासही मनाई केली होती. मेला चित्रपटाचं यश पाहिल्यानंतर लोकांना माझं काम आवडेल आणि ते मला काम देतील असं वाटलं होतं. त्यामुळे मी अनेक दिग्दर्शकांच्या कार्यालयात गेलो. मात्र मला अनेकांनी त्यांची अपॉइमेंटच दिली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’