Take a fresh look at your lifestyle.

मी काही बाहेर येणार नाही, माझ्या घरासमोर गर्दी करू नका !

सोशल कट्टा । सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहतात. त्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाण्याचा प्रयत्न करतात. रविवारी सिनियर बच्चन यांनी एक ट्विट केले की, “रविवारी माझ्या बंगल्यासमोर गर्दी करु नका!” याचं कारण तुम्हाला कळलंच असेल ते म्हणजे ‘कोरोना’.

मागचे २ महिने जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही करोना व्हायरसचा धोका वाढल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान सरकारने कोठेही गर्दी न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अमिताभ यांनी रविवारी त्यांच्या घराजवळ त्यांना पाहाण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे. दर रविवारी अमिताभ आपल्या चाहत्यांची भेट घेण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र यावेळी ते करोना व्हायरसमुळे घराबाहेर पडणार नाहीत. त्यामुळे घरासमोर चाहत्यांना गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

हे कोरोना ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. काही चाहत्यांनी या निर्णयावर आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: