‘धन्य ती वाघीण माऊली’; फोटो अमृताचे पण कौतुक आईचे? काय आहे कारण जाणून घ्या
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अमृता खानविलकर तिचं निखळ, सुंदर आणि तेजस्वी सौंदर्य यामुळे अतिशय चर्चेत असते. तीच नुसतं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर तिचे मोहक हास्य उभे राहते. अनेकजण तर अमृता म्हणजे ब्यूटी विथ ब्रेन असे म्हणतात. मुळात अमृता ही मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय मोजक्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे. अमृता नेहमीच सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. यामुळे ती स्वतःचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते आणि तिचे चाहते तिचं भरभरून कौतुक सुद्धा करतात. पण यावेळी थोडं वेगळंच कायतरी घडलं आहे. वेगळं म्हणजे, नेहमीप्रमाणे फोटो अमृताचा आहे पण कौतुक मात्र तिच्या आईच होताना दिसतंय. अर्थात कारणही तसेच आहे. अमृताने स्वत:चे पंजाबी स्लीव्हलेस कुर्त्यामधील सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि हे फोटो तिच्या आईने क्लीक केलेले आहेत.
या फोटोंमध्ये अमृता एकदम ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसत असली तरी फारच बोल्ड दिसत आहे. अमृताने काळ्या रंगाचा स्लीव्हलेस कुर्ता परिधान केल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे. यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. अमृताचे हास्य आणि मोहक अदांवर तिचे चाहते चांगलेच फिदा झाले आहेत याचा प्रत्यय तुम्हाला या फोटोंचा कमेंट बॉक्स देईल. या कमेंटपैकी एका कमेंटमध्ये अमृताच्या चाहत्याने म्हटले आहे कि, “हे असले घातक फोटोशूट करताना वाघाचं काळीज पाहिजे फोटोग्राफरचे,”. सामान्यपणे कमेंट केल्यानंतर लाखो फॉलोअर्स असणारे सेलिब्रिटी आपल्या कमेंटला उत्तर देतील अशी अपेक्षा चाहत्यांना नसते. मात्र या कमेंटवर अमृताने आवर्जून कमेंट केली आहे. या कमेंटमध्ये अमृताने, “आईने काढलेत फोटोज,” असे उत्तर दिले आहे.
अमृताच्या या रिप्लायनंतर मात्र एकामागोमाग एक कमेंट्स पडत राहिल्या आणि अमृतापेक्षा थोडे जास्तच तिच्या आईचे कौतुक होताना दिसले. एखाद्या प्रोफेश्नल फोटोग्राफरने फोटो काढल्याप्रमाणे हे फोटो सुंदर आहेत असे सांगताना एका चाहत्याने केलेल्या या कमेंटला अमृताने रिप्लाय दिला आणि अनेकांनी तिचा हा रिप्लाय थंब्स दाखवून लाइक केला आहे. या कमेंटचाच संदर्भ घेत एकाने, “मग आई वाघीण आहे,” असंही म्हटलंय. तर अन्य एका युजरने धन्य ती वाघीण माउली अशीही कमेंट केली आहे. एकंदर काय अनेकांच्या सौंदर्याचे रहस्य संतूर साबण असतो, तर अमृताच्या सौंदर्याचे रहस्य फोटोग्राफर मॉम आहे, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.