Take a fresh look at your lifestyle.

कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरबाबत अनन्या पांडेचं ‘मोठं’ वक्तव्य !

0

मुंबई | स्टुडेंट ऑफ द इयर 2 या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या अनन्या पांडेला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. तुम्हाला माहीत आहे का की, अनन्या पांडेदेखील तिचा सिनेमा ‘पती, पत्नी और वो’ ला घेऊन सुपरएक्साईडेट आहे. लवकरच तिचे चाहते तिला दुसऱ्या सिनेमात पाहू शकतात. याशिवाय तिच्या एक्साईटमेंटचे आणखीही एक कारण आहे. ज्याबाबत तिने स्वत:च खुलासा केला आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अनन्याने तिच्या आगामी सिनेमाला घेऊन खूप साऱ्या गप्पा मारल्या आहेत. अनन्या म्हणाली की, ‘सध्या सिनेमाच्या फर्स्ट शेड्युलची शुटींग पूर्ण झाली आहे. आता पुढील आठवड्यात या सिनेमाच्या दुसऱ्या शेड्युलच्या शुटींगला सुरुवात होणार आहे.’

कार्तिक आर्यनसोबत काम करणं म्हणजे…’ : अनन्या

पुढे बोलताना अनन्या म्हणाली की, ‘सिनेमाच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या दुसऱ्या शेड्युलमध्ये मला कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मी सुपरएक्साईटेड आहे. कार्तिक हा चांगला अभिनेता तर आहे. सोबतच तो एक चांगला माणूसही आहे. कार्तिक सोबत दुसऱ्यांदा काम करण्याची संधी मला मिळणार आहे. हे म्हणजे एखाद्या स्वप्नासारखं आहे.’

‘भूमी पेडणेकरकडून मला…’ : अनन्या

भूमी पेडणेकरबाबत बोलताना अनन्या म्हणते की, ‘भूमी पेडणेकरकडून मला खूप काही शिकायला मिळणार आहे. ती खूप इंस्पायर करणारी अ‍ॅक्ट्रेस आहे. अनन्याचा हा सिनेमा १९७८ साली आलेल्या पती पत्नी और वो या सिनेमाचाच रिमेक असणार आहे. अनन्याच्या या दुसऱ्या सिनेमाला घेऊन ती खूपच खुश आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: