Take a fresh look at your lifestyle.

अमिताभ बच्चन यांच्या कौतुकाने आनंदून गेली ‘अंग्रेजी मीडियम’ची अभिनेत्री,त्यांनी लिहिले की…

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । अमिताभ बच्चन यांनी राधिका मदान हिला ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटातील अभिनयाच्या कौतुकाचा हस्तलिखित संदेश पाठविला. अशा परिस्थितीत अभिनेत्री राधिका मदान म्हणाली की तीला खूपच भावुक आणि सन्मानीत वाटत आहे. राधिकाने इंस्टाग्रामवर हा संदेश शेअर करताना लिहिले की, ‘अंग्रेज मीडियम’ या चित्रपटातील तुमच्या अभिनयाचे मी कौतुक करीत आहे. काल मी तो चित्रपट पाहिला आणि तुम्हाला संदेश लिहिण्यापासून थांबवू शकलो नाही.तुम्ही खूप गंभीर आणि संतुलित अभिनय केला. तुम्हाला समृद्धी आणि यश मिळेल. “

 

कॅप्शनमध्ये राधिका मदानने लिहिले की, “काय बोलावे किंवा काय लिहावे ते मला समजत नाही..माझ्याकडे शब्दच नाहीत आणि मी खूप आभारी आहे. अमिताभ बच्चन सर माझ्यासाठी हा एक प्रकारचा सन्मान आहे.मी नेहमीच कल्पना करायचे कि माझ्या चित्रपटाच्या रिलीजनंतर माझ्या घराची डोअरबेल वाजेल आणि बाहेर दाराजवळ उभे असलेले कोणीतरी असे म्हनेलं की ‘अमिताभ बच्चन सरांनी तुला फुलं दिली आहेत आणि एक चिठ्ठी पाठविली आहे ‘आणि त्या नंतर लगेच मी बेशुद्ध होते. “

 

 

राधिका मदान म्हणाली की हा मेसेज तिला अधिक चांगल्या कामासाठी प्रेरणा देईल.

 

Comments are closed.

%d bloggers like this: