Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील आणखी एक कपल विवाहबद्ध होण्यास तयार; मार्चचा मुहूर्त गाठणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या वर्षी बी टाऊनचे बहुचर्चित कपल अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह सोहळा जैसलमेरमध्ये अगदी धुमधडाक्यात पार पडला. हा शाही विवाह सोहळा सोशल मीडियापासून सर्वत्र चर्चेत होता आणि चांगलाच गाजला. यानंतर आता बॉलिवूडचं आणखी एक बहुचर्चित उच्च कुटुंबातील कपलं रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती मात्र त्यांना जरा उशीरच आहे. पण बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एक कपल असं आहे जे चर्चेतसुद्धा असत आणि आणि विवाह बंधनात अडकण्याची तयार सुद्धा आहे. हे कपल म्हणजे फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर.

या वर्षात मार्च महिन्यामध्ये बॉलिवूडचं मोस्ट एडोरेबल कपल अभिनेता फरहान अख्तर आणि मॉडेल शिबानी दांडेकर लग्नबंधनात अडकणार आहे. ते दोघेही दीर्घ काळापासून रिलेशनशिपमध्ये आहे. आतापर्यंत या दोघांनीही कधीच आपल्या नात्याला लपवलं नाही.

पण मध्यंतरी २ वर्षांपूर्वी फरहान पत्नीपासून विभक्त झाला आणि यानंतर फरहान – शिबानीच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. दीपवीर यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये त्या दोघांना पहिल्यांदाच एकत्र पाहिले गेले आणि माध्यमांच्या कॅमेराने त्यांना टिपले. यानंतर पुढे सोशल मीडियावर दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली. अखेर हे कपल लग्न बंधनात अडकणार असून येत्या मार्च महिन्याचा मुहूर्त गाठला आहे.

फरहान अख्तर हा एक भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, पटकथा लेखक, पार्श्वगायक, निर्माता आणि टेलिव्हिजन होस्ट आहे. तो एक आघाडीचा बॉलिवूड अभिनेता आहे. तर शिबानी दांडेकर एक भारतीय- ऑस्ट्रेलियन गायिका, अभिनेत्री, अँकर आणि मॉडेल आहे.

तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात अमेरिकन टेलिव्हिजनमध्ये टेलिव्हिजन अँकर म्हणून केली. भारतात परतल्यानंतर, तिने मॉडेल आणि गायिका म्हणून काम करण्यासोबतच हिंदी टेलिव्हिजन आणि कार्यक्रमांमध्ये अनेक कार्यक्रम होस्ट करण्यास सुरुवात केली.