Take a fresh look at your lifestyle.

“नाईट लाईफ म्हणजे काय असतं?” आर्चीचा भाबडा सवाल

सोशल कट्टा । नाईट लीफ विषयी साऱ्या तरुणाईला खूप उत्साह असलेला नेहमी दिसत आलाय. राज्य सरकारने २७ जानेवारीपासून मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. तर काहींनी समर्थनही केलं. नाइट लाइफबद्दल सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूला तिचं मत विचारला असता, तिच्याकडून अजबच प्रतिक्रिया आली. नाइट लाइफबद्दल प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच रिंकूने विचारलं, “नाइट लाइफ म्हणजे काय रे भाऊ?”

‘सैराट’ फेम आर्ची अर्थात रिंकू सध्या तिच्या ‘मेकअप’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्य व्यग्र आहे. यानिमित्तच तिने पुण्यात एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिला नाइट लाइफविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी आपल्याला नाइट लाइफ म्हणजे काय हेच ठाऊक नसल्याचं रिंकूनं म्हटलं. त्यामुळे तिचं हे उत्तर ऐकून उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का बसला. नाइट लाइफ म्हणजे काय हे मला माहित नाही, त्यामुळे त्यावर मी मत व्यक्त करू शकत नाही, असं रिंकू यावेळी म्हणाली.

‘सैराट’ या पहिल्याच चित्रपटातून रिंकू राजगुरू हे नाव घराघरात पोहोचलं. पदार्पणातच रिंकूला मोठं यश मिळालं. त्यानंतर ती ‘कागर’ या चित्रपटात झळकली. आता तिचा ‘मेकअप’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रिंकूने पहिल्यांदाच शहरातील एका तरुणीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत चिन्मय उदगीरकर मुख्य भूमिकेत आहे.