Take a fresh look at your lifestyle.

अशोक सराफांनी शर्टचे दोन बटन उघडे ठेवण्याच्या ‘स्टाईल’चे उघडले गुपित !

मराठी सृष्टी । मराठीतला सर्वात जास्त चाहत्यांचं प्रेम मिळविलेला कोणी स्टार असेल तर ते अशोक सराफ. त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. लवकरच त्यांचा प्रवास हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. याच निमित्ताने त्यांनी त्यांच्याशी निगडीत अनेक गोष्टीं उलगडल्या आहेत.

   सुरूवातीच्या सिनेमातील त्यांच्या लूकवर नजर टाकली तर ते नेहमी त्यांच्या शर्टाचे पहिले दोन बटण उघडेच ठेवल्याचे पाहायला मिळते. या बटणाच्या मागेही एक रहस्य दडले होते, पहिल्यांदाच आपल्या स्टाइलबाबत एव्हरग्रीन अशोक सराफ यांनीही आपले मत मांडले आहे. त्यांनी सांगितले की, सुरूवातीच्या काळात जेव्हा त्यांनी त्यांच्या करिअरला सुरूवात केली तेव्हा. शर्टाचे पहिले दोन बटणं असेच उघडे ठेवायची फॅशन होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉलर पर्यंत शर्टाचे बटणं लावले की अवघडल्यासारखेही व्हायचे. त्यामुळे कॉलरपर्यंत बटण न लावत ते असेच मोकळे ठेवणे जास्त कंम्फर्टेबल वाटायचे म्हणून त्यांच्या प्रत्येक सिनेमात शर्टाचे पहिले दोन बटण उघडेच असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

   अशोक सराफ यांनी आणखी एक किस्सा सांगितलं कि, मी १९७४ला पहिला चित्रपट केला. पण त्यानंतरही मी बँकेत नोकरी करणे सोडले नव्हते. चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे मला बँकेत जाणे जमायचे नाही. १९७८ ला तर संपूर्ण वर्षभर मी बँकेत गेलोच नव्हतो. मला बरे नाही असे सांगत मी मेडिकल सर्टिफिकेट दिले होते. काही महिने ऑफिसला गेलेलोच नसल्याने माझ्या ऑफिसमधील काही वरिष्ठ मंडळी घरी आली. मी त्यावेळी घरी नव्हतो. माझ्या बहिणीने दरवाजा उघडला. मी कुठे आहे असे तिला विचारले असता मी कोल्हापूरला गेलो असल्याचे तिने सांगितले. अखेर माझ्यामुळे माझ्या सहकर्मचाऱ्यांना त्रास होत आहे असे मला वाटल्याने मी नोकरी सोडली होती.

MV5BMTUzNTU3ODIxNF5BMl5BanBnXkFtZTgwOTE4OTEwMTI@._V1_SY1000_CR0017641000_AL_-1024x580Screen Shot 2020-01-30 at 6.39.21 PMScreen Shot 2020-01-30 at 6.35.50 PM

Comments are closed.