Take a fresh look at your lifestyle.

‘बधाई हो’चा सिक्वेल येणार “बधाई दो”…आयुष्मान च्या जागी दिसणार हा अभिनेता मुख्य भूमिकेत

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । आयुष्मान खुरानाच्या “बधाई हो” या हिट चित्रपटाचा लवकरच सिक्वल येणार आहे , पण यावेळी आयुष्मानच्या जागी राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे नाव ‘बधाई दो’ असेल तर राजकुमारच्या सोबत भूमी पेडणेकर असेल .

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, “बधाई दो” मध्ये राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर असतील .. ‘बधाई हो’ चा हा सिक्वल आहे. हा चित्रपट हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित करणार आहेत, तर जंगली पिक्चर्स निर्मिती करतील. या चित्रपटाची शूटिंग यावर्षी जूनमध्ये सुरू होणार असून पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
माध्यमांच्या वृत्तानुसार, राजकुमार राव ”बधाई दो” मध्ये कॉप साकारणार आहेत, तर भूमी पीटी शिक्षक होतील. दोघेही पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

विशेष म्हणजे २०१८ च्या ‘बधाई हो’ मध्ये आयुष्मानने समाजाच्या विचारांवर भाष्य केले होते, ज्यात वृद्ध महिला गर्भवती असते तेव्हा कुटुंबाला लाज वाटते. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. यात सान्या मल्होत्रा, गजराज राव आणि नीना गुप्ता यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्याचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले होते.

या सिनेमाशिवाय राजकुमार राव ‘छलांग’, ‘लूडो’ और ‘रूही अफ्जाना’ चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. त्याच वेळी, भूमी पेडणेकर सुद्धा ‘तख्त’ मध्ये दिसेल.