Take a fresh look at your lifestyle.

‘बधाई दो’ ट्रेलर रिलीज; राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर घेऊन आले आहेत धमाल कॉमेडी सिनेमा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या असे एकापेक्षा एक हटके चित्रपट प्रदर्शित होत आहेत कि बस्स. त्यामुळे हे संपूर्ण वर्ष फक्त मनोरंजन.. मनोरंजन.. आणि मनोरंजन करणारे ठरणार आहे. एकीकडे रोमांस तर दुसरीकडे ऍक्शन. यानंतर आता कॉमेडीचा तडका घेऊन बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता राजकुमार राव आणि आघाडीची अभिनेत्री भूमी पेडणेकर येत आहेत. दोघेही पहिल्यांदाच एकमेकांसोबत रुपेरी पडद्यावर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘बधाई दो’ असे आहे. तर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. शिवाय प्रेक्षकांनीही या चित्रपटाच्या धमाल कॉमेडी ट्रेलरला विशेष पसंती दिली आहे.

‘बधाई हो’ या चित्रपटात फुल्ल ऑन कॉमेडी पाहायला मिळणार आहे. हा ट्रेलर पाहूनच तुम्हाला समजेल कि राजकुमार आणि भूमी काय? आणि किती? पॉट धरून हसवणार आहेत. याशिवाय चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटात काही वेगळे विषय आहेत असेही सांगितल्यामुळे कथानकाबाबत एक वेगळीच उत्सुकता वाटत आहे. सोमवारी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. यानंतर पोस्टर रिलीज होताचं ते तुफान लोकप्रिय झाले होते. यानंतर आता ट्रेलर कमाल करताना दिसतोय.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘बधाई दो’ हा चित्रपट फक्त चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. तर भूमी पेडणेकर एक पिटी टीचर आहे. शिवाय ती एक अशी मुलगी आहे जिला मुलांमध्ये रस नाही.

पण नंतर ती एका मुलाशी लग्न करते आणि त्यानंतर जी धमाल मस्ती होते तीच या चित्रपटात आपल्याला एन्जॉय करायची आहे. या चित्रपटात राजकुमार, भूमी यांच्याव्यतिरिक्त सीमा पाहवा, शीबा चड्ढा, लवलीन मिश्रा, नितेश पांडे, शशी भूषण, चुम दरंग आणि दीपक अरोरा हे कलाकार देखील आहेत. हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारी २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.