हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय अध्यात्मिक मालिका ‘बाळुमामाच्या नावाने चांगभलं’चा प्रेक्षकवर्ग फार मोठा आहे. मालिकेतील प्रसंग आणि दैवी चमत्कार प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करत असतात. या मालिकेत श्री संत बाळूमामा यांची भूमिका अभियन्ता सुमित पुसावळे याने साकारली आहे. मालिकेचे शूटिंग आणि आगामी सिनेमा यांमुळे सुमित त्याच्या पत्नीला फारसा वेळ देऊ शकत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे. बरोबर वर्षभरापूर्वी आज पहिल्यांदा त्यांचे बोलणे सुरु झाल्याची आठवण शेअर करत त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
सुमितने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने स्वतःचा आणि पत्नीचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि,
मी : हॅलो मोनिका, मी सुमित
तु : हा हाय,
मी : काय करतेयस?
तु : काय नाही काम चालू आहे.
मला आठवतंय हे आपलं पहिलं बोलणं, आज बरोबर एक वर्ष झालं त्या गोष्टीला. एकमेकांचे बायोडाटा आपल्या घरच्यांनी पहिले, आपल्याला ते पाठवले. एकमेकांचे नंबर एक्सचेंग झाले. अन बोलायला सुरवात. मग काय एकमेकांच्या आवडी निवडी, पसंत नापासंत, घरी कोण कोण असत ह्या सगळ्या गोष्टी बोललो. मग msg, नंतर व्हिडीओ कॉल वर बोलायला लागलो. आपण भेटलो, आपल्या घरचे एकमेकांना भेटले आणि बघता बघता 6 महिन्यात लग्न पण होऊन गेलं’.
‘ह्या एका वर्षात आपण खुप साऱ्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर केल्यात, आपली सुख दुःख, सगळं काही. एक वर्ष कसं निघून गेलं कळलं पण नाही, असं वाटतंय गेल्या एक दोन महिन्याची गोष्ट आहे ही. तुझ्यामुळे अजुन एक खुप छान फॅमिली मिळाली. तु खुप कमाल आहेस मोना, थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. आय एम सो लकी टू हॅव यू. थँक्यू सो मच. माझ्या आयुष्यात येण्यासाठी, थँक्यू सो मच माझ्या आयुष्याचा जोडीदार होण्यासाठी. मला माहितेय आपण कुठे फिरायला नाही गेलोय माझ्या कामामुळे पण तिथे सुद्धा तु मला समजून घेतलंस. त्यासाठी खरंच थँक्स. तु खुप स्पेशल आहेस माझ्यासाठी आणि नेहमी असशील. लव्ह यू अ लॉट’. सुमितच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी विविध कमेंट करत त्याची आणि मोनिकाची जोडी आपल्याला खूप आवडत असल्याचे म्हटले आहे.
Discussion about this post